शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 08:56 IST

Health: ‘माझे असणे किंवा नसणे हे कोणासाठी महत्त्वाचे आहे?’-असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे किंवा खरं म्हणजे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे?

- वंदना अत्रे (दुर्धर व्याधीग्रस्तांच्या मदतगटात कार्यरत)  ‘माझे असणे किंवा नसणे हे कोणासाठी महत्त्वाचे आहे?’-असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे किंवा खरं म्हणजे असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे?- खूप डोळे उघडणारा आहे हा प्रश्न आणि रोजच्या धकाधकीत तो कधीच असा समोर येत नाही. मला स्पष्ट आठवते आहे, केमोची पहिली सायकल घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडले. एप्रिलच्या उष्ण रणरणत्या दुपारीसुद्धा त्या बाहेरच्या जगात नेहमीची धावपळ सुरू होती. वाहने आणि माणसे यांची न संपणारी लगबग बघून मला नकळतच एकदम रडू कोसळले. वाटले मी कॅन्सरने आजारी; पण सगळे जग त्याच्याच वेगाने धावतेय. कोणालाच माझ्याबद्दल काळजी, दु:ख काहीच वाटत नसेल?..

आज तो क्षण आठवताना प्रत्येक वेळी माझ्या त्या समजुतीचे हसू येते..! ‘जगाच्या व्यवहारात आपण एक महत्त्वाची व्यक्ती आहोत’, असा उगीचच आपला समज असतो. या समजुतीचा एक भाग म्हणजे ‘माझ्याशिवाय घर चालूच शकणार नाही’, असा प्रत्येक स्त्रीला असलेला भ्रम! त्या दिवशी माझ्यासाठी हा भ्रमाचा भोपळा फटकन फुटला. जाणवले, आपण असण्या-नसण्यामुळे जगाला चिमूटभरसुद्धा फरक पडत नसतो..

मग माझे असणे कोणासाठी महत्त्वाचे? - माझ्यासाठीच! ‘आपले जगणे आधी स्वत:साठी आहे’, हे कधीतरी असे लख्खपणे समजले पाहिजे. तरच ते आनंदी होण्याचा विचार मनात येऊ शकतो. कॅन्सर समोर उभी असताना आणि जगण्याची कोणतीही हमी नसताना मला आनंदाचा विचार सुचत होता! हा नक्की वेडेपणाच; पण हाताशी असलेला प्रत्येक क्षण जमेल तेवढा आनंदाने जगण्याची इच्छा प्रबळ होते तेव्हा हा वेडेपणासुद्धा साधतो! नक्की. 

त्यासाठी काही प्रश्न स्वत:ला विचारावे लागतात. पहिला अर्थातच, माझा आनंद कशात आहे? आजवर कधी शोध घेतला त्याचा आपण? पैसे, हौसेने जमवलेल्या अगणित वस्तू, नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी मिळालेले पद-सन्मान. कुठे दिसतो मला तो आनंदाचा रसरशीत कंद? हा गुंता सोडवताना जीव थकून जातो. या शोधात समोर येणारे आणखी काही प्रश्न ओलांडत असताना हळूहळू दिशा उजळत जातात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स