शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

छातीमधून येताेय शिट्टीसारखा आवाज; श्वसन व्यवस्थेवर हल्ला, बालवृद्धांना खोकल्याचा होतोय त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:47 IST

या थंड वातावरणात दमटपणा असल्यामुळे दरवर्षी या काळात श्वसनाचे विकार पाहायला मिळतात.

मुंबई : गेल्या काही दिवसांत श्वसनविकाराच्या व्याधीमध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू आहे. काही नागरिक घरीच यावर उपाययोजना करीत आहेत. तर काही नागरिकांना मात्र या आजारावरील उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे लागत आहे.

काही नागरिकांना या श्वसनविकाराचा इतका त्रास होत आहे की, त्यांच्या छातीमधून शिट्टीसारखा आवाज येत असून, घुरघूर वाढली आहे. त्यांच्या श्वसनमार्गामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यांना न्यूमोनियासारखा त्रास होऊन रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. ऐन दिवाळी सुरू होताना सध्या राज्यातील विविध शहरांत वायुप्रदूषणाने थैमान घातले आहे. अशुद्ध हवा घेत नागरिक दैनंदिन दिवस ढकलत आहेत. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान ऋतुबदलानंतर थंडी काही प्रमाणात सुरू होत असते. 

या थंड वातावरणात दमटपणा असल्यामुळे दरवर्षी या काळात श्वसनाचे विकार पाहायला मिळतात. मात्र, यंदा हवेतील प्रदूषणाने मोठी उंची गाठली आहे. शहरातील काही भागांतील हवा गुणवत्ता निर्देशांक पाहिला तर तो काही  ठिकणी २०० तर काही ठिकाणी ३०० च्या पार गेला आहे. या अशा वातावरणात दीर्घ काळ राहिल्यास श्वासविकारच्या व्याधी सुरू होतात.

 कोणते आजार बळावतात?  दमा, अस्थमा, शिंका येणे,  नाक गळणे, डोकेदुखी, आळस येणे, थकवा जाणवणे,  ब्रॉन्कायटिस, श्वसन मार्गातील अडथळ्यामुळे नागरिकांना श्वास घेताना जीव कोंडल्यासारखा वाटतो. ज्या नागरिकांना पूर्वीपासून श्वसनाच्या व्याधी आहेत, त्यांच्यामध्ये आजार अधिक प्रमाणात बळावला आहे. तर सर्वसाधारण नागरिकांनासुद्धा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. 

स्टेथोस्कोप सांगतोय लक्षणे रुग्णाचे निदान तत्काळ करण्यासाठी स्टेथोस्कोप  महत्त्वाची भूमिका बजावत असतो. डॉक्टर रुग्णाच्या छाती आणि पाठीवरून काही मिनिटे स्टेथोस्कोप फिरवून श्वसनक्रियेमधील विविध गोष्टी टिपत असतात.  त्यांना त्यावरून आजाराचे गांभीर्य चटकन कळते. त्यानुसार ते रुग्णांची उपचारपद्धती निश्चित करत असतात.   सध्या श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये श्वास घेण्याचा वेग यावरून डॉक्टर अनेक आजारांचे अनुमान ठरवत असतात. त्यासोबत हार्टबिट आणि पोटातील हालचालीसुद्धा या साधनांद्वारे जाणून घेत असतात.

तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे, विशेष करून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्वसन विकाराशी संबंधित रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषण असल्यामुळे श्वसनमार्गाच्या खालच्या आणि वरच्या भागात संसर्ग होतो. सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाणे काही काळ थांबविले पाहिजे. त्यामुळे आणखी श्वसनविकाराच्या व्याधी वाढू शकतात. घराच्या घरी काही व्यायाम करता येईल ते पाहावे. योग आणि प्राणायाम शक्य असल्यास करावे. दिवाळीत प्रदूषण दुपटीने असते. त्यामुळे श्वसनविकाराचे रुग्ण दिवाळीच्या काळात शक्य असेल तर पाच सहा दिवसांकरिता शहराबाहेर जातात. - डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, 

टॅग्स :Healthआरोग्य