शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काही लोकांसाठी भेंडीची भाजी खाणं ठरू शकतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी टाळावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:40 IST

Lady Finger Side Effects : भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असले आणि त्यांचे शरीराला अनेक फायदे होत असले तरी काही लोकांसाठी भेंडी नुकसानकारक ठरू शकते.

Lady Finger Side Effects : लहान मुले असो वा घरातील मोठ्या व्यक्ती सगळेच आवडीने भेंडीची भाजी खातात. भेंडीची भाजी चवीला तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. भेंडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस असतात.

भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असले आणि त्यांचे शरीराला अनेक फायदे होत असले तरी काही लोकांसाठी भेंडी नुकसानकारक ठरू शकते. असे काही आजार असतात ज्यांदरम्यान भेंडी खाणं घातक ठरू शकतं. अशात कुणी भेंडीची भाजी खाऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कुणी खाऊ नये भेंडी?

एलर्जी असलेल्यांनी

जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची एलर्जी असेल तर याचं सेवन करणं बंद करा. भेंडी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुरळ, खाज, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास, पोटात वेदना अशा समस्या होऊ शकतात.

पचनासंबंधी समस्या असल्यास

जर तुम्हाला आधीच बद्धकोष्ठता, जुलाब किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारख्या पचनासंबंधी समस्या असेल तर भेंडी खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते. 

डायबिटीस असेल तर...

भेंडीमध्ये ब्लड शुगर कमी करणारे गुण असतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचं औषध घेत असाल तर भेंडी खाण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

किडनी स्टोन

किडनी स्टोन झालेल्यांनी भेंडीची भाजी खाऊ नये. कारण यात भरपूर ऑक्सलेट असतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर भेंडीची भाजी खाऊ नये. 

गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या

भेंडीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे काही लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या होऊ शकतात. जशा की, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि अपचन. त्यामुळे अशा समस्या असलेल्या लोकांनी भेंडीची भाजी अजिबात खाऊ नये.

हाय ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांनी पोटॅशिअम असलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत. भेंडीमध्ये भरपूर पोटॅशिअम असतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर आणखी वाढू शकतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य