Best Oil for Weight Loss: भारतात तेलाचा वापर रोज वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तेलाशिवाय अनेक पदार्थांचा किंवा भाज्यांचा विचारही केला जाऊ शकत नाही. तेल शरीरासाठी आवश्यकही असतं, पण याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरात चरबी वाढून लठ्ठपणा वाढतो आणि सोबतच हृदयरोगांचा धोकाही वाढतो. यामुळे डॉक्टर नेहमीच तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला देत असतात. अशात कोणतं तेल आरोग्याचं नुकसान करणार नाही किंवा कोणतं तेल घातक असतं? असा प्रश्न मनात येणं सहाजिक आहे. त्यामुळे एक्सपर्टनी सांगतात की, रिफाइंड तेल सगळ्या घातक असतं. बाहेरचे तळण्यासाठी जास्तीत जास्त लोक रिफाइंड तेलाचा वापर करतात. अशात कोणत्या तेलानं लठ्ठपणा वाढणार नाही, हे जाणून घेऊ.
कोणतं तेल फायदेशीर?
भरपूर रिसर्चमधून समोर आलं आहे की, खाण्यासाठी मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल सगळ्यात बेस्ट तेल आहेत. या तेलांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतं. जे हृदयासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. हृदयासंबंधी अनेक समस्या कमी करण्यास मोहरीच्या तेलानं मदत मिळते.
मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट जास्त असतो म्हणजे हे तेल जेव्हा जास्त गरम होतं तेव्हाच याची संरचना खराब होते. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं, जे मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतं. या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करतात. मोहरीचं तेल त्वचा आणि केसांसाठी फार चांगलं असतं. या तेलानं शरीरातील वेदना दूर होते. काही रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, मोहरीच्या तेलानं पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.
ऑलिव्ह ऑइलचे फायदे
ऑलिव्ह ऑइलमध्येही अनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे हृदयासाठी फायदेशीर असतं. यानं रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका कमी होतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई सुद्धा असतं. जे शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये मदत करतं.
इतर फायदेशीर तेल
मोहरीचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल खाण्यासाठी सगळ्यात चांगले असले तरी, त्यासोबतच तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
कोणत्याही प्रकारच्या व्हेजिटेबल तेलाला कधीही जास्त गरम करू नये. जर तेल जास्त गरम केलं तर त्याचं शॉर्ट चेन फॅटी अॅसिड तुटेल आणि ते ऑक्सीडाइन होऊ लागले. ज्यामुळे इन्फ्लामेशन वाढेल.