शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

कोणत्यावेळी फळं खाल्ल्याने जास्त मिळतो फायदा? वाचाल तर फायद्यात रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 10:58 IST

एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, दिवसातील कोणत्याही विशेष वेळी फळं खाल्ल्याने शरीरावर याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा प्रभाव पडू शकतो. 

अनेक लोकांना हे माहीत नसतं की, कोणत्यावेळी फळं खाणे आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि लाभदायक ठरतं. कोणत्याही वेळी फळं खाल्ल्याने व्यक्तीला पचनाची समस्या, पोटदुखी, अनिद्रा इतकेच नाही तर डायबिटीजसारखी गंभीर समस्याही होऊ शकते. एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, दिवसातील कोणत्याही विशेष वेळी फळं खाल्ल्याने शरीरावर याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा प्रभाव पडू शकतो. 

नुकसानदायकही होऊ शकतात फळं

काही फळं ही सकाळच्या वेळी खाल्ल्याने शरीराला लगेच आणि अतिरीक्त एनर्जी मिळते. तर काही फळं त्याचेवळी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळत नाही. सामान्यपणे फळं खाण्याची योग्य वेळ यासाठी महत्त्वाची आहे. कारण फळांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. जे सामान्य ग्लूकोजमध्ये बदलून शरीराला ऊर्जा प्रदान करतात. पण हे ग्लूकोज जेव्हा शरीराकडून उपयोगात आणलं जात नाही, तेव्हा ते चरबीच्या रुपात जमा होतं. यामुळे वजन वाढण्यासोबतच इतरही समस्या निर्माण होतात. 

सकाळची वेळ फळं खाण्यासाठी योग्य

तज्ज्ञांनुसार, फळं खाण्याची योग्य वेळ ही सकाळची असते. सकाळी रिकाम्यापोटी फळं खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया फळातील ग्लूकोजचं वेगाने विघटन करतं. त्यामुळे शरीराला फळातील पोषक तत्त्वांचा फायदा होतो. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, जे शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासोबतच शरीरात रक्त वाढवण्यासही मदत करतात. मात्र योग्य वेळीच फळं खाल्ले तर यातील पोषक तत्त्वे शरीराला मिळतात. त्यामुळे फळांमधील पोषक तत्वांचा फायदा घ्यायचा असेल तर सकाळी जास्तीत जास्त फळं खावीत. 

हेल्दी स्नॅक्स

तुम्ही सकाळी वेगवेगळ्या फळांना एकत्र करुन स्नॅक्सच्या रुपातही खाऊ शकता. त्यासोबतच सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यानच्या वेळेतही तुम्ही फळं खाऊ शकता. सकाळी नाश्त्यावेळी सफरचंद, पपई, कलिंगड किंवा किवी ही फळं खाऊ शकता.

सायंकाळीही होतो फायदा

सकाळ सोबतच दोन जेवणांच्या मधल्या वेळेतही फळं खाणं चांगलं मानलं जातं. कारण दोन जेवणांच्या मधल्या काळात पोट रिकामं असतं. अशावेळी पोटात वेगवेगळ्या प्रकारचे एंजाइम रिलीज होतात. याने पचनक्रियेला गती मिळते आणि फळांमध्ये असलेलं ग्लूकोज सहजपणे पचतं. तसेच शरीराला फायबर, मिनरल्स आणि इतरही पोषक तत्व मिळतात. तसेच सायंकाळीही फळं खाणं महत्त्वाचं ठरतं. 

वजन नियंत्रणात राहतं

दोन जेवणांच्या मधल्या वेळेत फळं खाणं यासाठीही चांगलं असतं, कारण याने व्यक्तीची भूक संपत नाही. तसेच फळं सहजपणे लवकर पचतात. या वेळेत फळं खाल्ल्याने व्यक्तीचं वजनही नियंत्रित राहतं आणि जाडेपणाची समस्याही होत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य