शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलं आणि वयोवृद्धांना का दिला जातो बदामाची साल न खाण्याचा सल्ला? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:37 IST

Almond Peels Side Effects : अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो? 

Almond Peels Side Effects : बदाम खाण्याचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. याने शरीराला शक्ती मिळते आणि मेंदुची क्षमताही वाढते. बरेच लोक बदामाचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये याचा समावेश केला जातो. काही लोक बदाम रात्रभर भिजवून ठेवून सकाळी खातात. भिजवलेले बदाम खाताना लोक त्याची साल काढून टाकतात. पण अनेकांना प्रश्न पडतात की, बदामाची साल काढून टाकावी की नाही? या सालीमुळे काही नुकसान होतं का? लहान मुले आणि वयोवृद्धांना बदामाची साल न खाण्याचा सल्ला का दिला जातो? 

बदामाची साल फायदेशीर की नुकसानकारक?

अनेक एक्सपर्ट सांगतात की, बदामाच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतं. ज्यामुळे केस आणि त्वचेला पोषण मिळतं. म्हणजे बदामाची सालही शरीरासाठी फायदेशीर असते.

बदाम सालीसोबत खावेत की नाही?

अनेकांना प्रश्न पडत असतो की, बदाम सालीसोबत खावेत की साल काढून? एक्सपर्टनुसार, अनेक जुन्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, भिजवलेले बदाम नेहमी साल काढूनच खावेत. कारण पाण्यात भिजवल्यावर सालीमध्ये टॅनिन नावाचं तत्व तयार होतं. जे शरीरासाठी नुकसानकारक असतं.

भिजवलेल्या बदामाची साल काढली तर त्याची शक्ती आणखी वाढते. मात्र, न्यूटिशन आणि साइंटिफिक आधारावर नुकत्याच समोर आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, बदामाची सालही खूप फायदेशीर असते. जर बदाम सालीसोबत खाल्लेत तर शरीराला अनेक फायदे मिळतात. यातून शरीराला फायबर आणि व्हिटॅमिन ई मिळतं. वय आणि परिस्थितीनुसार, बदाम सालीसोबत किंवा साल काढून खाल्ले पाहिजेत.

लहान मुले आणि वृद्धांसाठी बदामाची साल नुकसानकारक कशी?

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर कुणाला पचनासंबंधी समस्या असेल तर त्यांचं पचन तंत्र अनेक गोष्टी योग्यपणे पचवू शकत नाही. जास्तकरून वयोवृद्ध आणि लहान मुलांचं पचन तंत्र कमजोर असतं. त्यामुळे त्यांना साल काढूनच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांना पुरेसं पोषण मिळावं. जर त्यांनी सालीसोबत बदाम खाल्लेत तर पचनासंबंधी समस्या होऊ शकते. जर पचनासंबंधी समस्या नसेल तर तुम्ही बदाम सालीसोबतही खाऊ शकता.

एका दिवसात किती बदाम खाऊ शकता?

एका रिपोर्टनुसार, एक वयस्क व्यक्ती एक दिवसात कमीत कमी २३ बदाम खाऊ शकते. इतके बदाम खाल्ल्याने शरीराला पुरेसं प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल आणि हेल्दी फॅट मिळतं. यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्याने कॅलरी वाढू शकतात आणि फॅटही वाढू शकतं.

वातावरणानुसार खा बदाम

आयुर्वेदानुसार, बदामामुळे वात आणि पित्त दोष संतुलित करण्यास मदत मिळते. बदाम गरम असतात त्यामुळे यांचं जास्त सेवन केल्यास पित्त दोष वाढू शकतो. ज्यामुळे पोटासंबंधी समस्या जसे की, अॅसिडिटी, पोटात जळजळ होऊ शकते. थंडीच्या दिवसांमध्ये जास्त बदाम खाऊ शकता. तर उन्हाळ्यात बदाम भिजवून खाल्ले पाहिजेत.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

बदाम भिजवून ठेवल्याने ते नरम होतात. अशात ते चावणं सोपं होतं. त्याशिवाय बदामाच्या सालीमध्ये फायटिक अॅसिड असतं जे पोषक तत्वांचं अवशोषण योग्यपणे होण्यास रोखतं. भिजवलेल्या बदामात हे तत्व कमी असतं.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य