शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

लिव्हर डिटॉक्ससोबतच शरीरातील अनेक समस्या दूर करतं 'हे' खास पाणी, वाचाल तर रोज प्याल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 11:18 IST

Raisins Water Benefits : शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचं सेवन करू शकता. हे खास ड्रिंक तुम्ही मनुक्यांपासून तयार करू शकता.

Raisins Water Benefits : चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे आजकाल लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. नेहमीच तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाईज न करणे, प्रमाणापेक्षा जास्त धुम्रपान करणे आणि मद्यसेवन करणे, फास्ट फूड खाणे यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही.

अशात शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही एका खास ड्रिंकचं सेवन करू शकता. हे खास ड्रिंक तुम्ही मनुक्यांपासून तयार करू शकता. तुम्ही नुसते मनुके खाल्ले तरी तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी हे खास ड्रिंक कसं तयार करावं आणि त्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहोत.

भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स

मनुक्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. मनुके एनर्जी असलेलं एक लो फॅट फूड आहे. ज्यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवले तर याचे फायदे अधिक वाढतात. जर मनुक्याचं पाणी रोज सकाळी अनोशा पोटी सेवन केलं तर याने अनेकप्रकारचे फायदे होतात.

कसं करावं तयार?

हे खास ड्रिंक तयार करण्यासाठी २ कप पाणी घ्या आणि १५० ग्रॅम मनुके घ्या. डार्क रंगाचे १५० ग्रॅम मनुके चांगले धुवून घ्या. २ कप पाणी उकडायला ठेवा आणि त्यात मनुके टाका. २० मिनिटे हे उकडू द्या. आता मनुके रात्रभर याच पाण्यात राहू द्या. सकाळी तुमचं ड्रिंक तयार होईल.

कसं आणि कधी करावं सेवन?

सकाळी अनोशा पोटी नाश्त्याच्या अर्धा तासआधी हे पाणी सेवन करू शकता आणि त्याआधी या पाण्यातील मनुके वेगळे काढा. आता पाणी सेवन करू शकता. तसेच मनुके खाऊ शकता. केवळ ३ दिवस हा उपाय कराल तर लिव्हरमधील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जाती. याने लिव्हर पूर्णपणे साफ होईल. 

काय आहेत याचे फायदे?

1) मनुक्याच्या पाण्यात असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सने बॉडी सेल्स हेल्दी होऊन कॅन्सरचा धोका कमी होतो.

2) या पाण्यात अमिनो अ‍ॅसिड असतं जे एनर्जी देतं. याने थकवा आणि कमजोरी दूर होते. तसेच या पाण्यात व्हिटॅमिन ए, बीटा केरोटीन आणि डोळ्यांसाठी फायदेशीर फायटोन्यूट्रिएंट्स असतात. याने नजरेची कमजोरी दूर होते.

3) मनुक्याच्या पाण्याने मेटाबॉलिज्म मजबूत करून फॅट बर्निंग प्रोसेज वाढते. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. या पाण्यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते.

4) तसेच मनुक्यातील सॉल्युबल फायबर पोटही साफ ठेवून गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम देतं.

5) मनुक्याच्या पाण्यात आयर्न, कॉपर आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. याने रक्ताची कमतरता दूर होऊ लाल रक्त पेशी हेल्दी होतात.

कुणी करावं सेवन?

ऑस्टियोपोरोसिसचे रूग्ण

हा आजार शरीरात कॅल्शिअम कमी असल्याने होतो. यात हाडं कमजोर होतात. मनुके खाल्ल्याने कॅल्शिअम आणि बोरोन भरपूर प्रमाणात मिळतं. कॅल्शिअम तुमची नखं, दात इत्यादींसाठी सुद्धा फायदेशीर असतात. 

बद्धकोष्ठता असणारे लोक

जर पोट बरोबर साफ होत नसेल तर मुनके खाणं सुरू करा. यात भरपूर फायबर असतं. जे शरीरासाठी रोज महत्वाचं असतं. याने मलत्याग सहजपणे करण्यास मदत मिळते. 

सतत थकवा असणाऱ्यांनी

सतत लवकर थकवा येत असलेल्या लोकांसाठी हे ड्राय फ्रूट रामबाण उपायासारखं काम करतं. यात भरपूर नॅचरल शुगर असते आणि कॅलरी असतात. याने तुमचं एंड्यूरेन्स वाढतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य