What Is Morning Banana Diet : केळं हे एक असं फळ आहे जे कोणत्याही वयाच्या लोकांना खायला आवडतं. कारण ते गोड तर असतंच सोबतच टेस्टीही असतं. इतकंच नाही तर केळींमधून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. केळीतून शरीराला भरपूर एनर्जी मिळते, त्यामुळेच खेळाडू केळी भरपूर खातात. सध्या सोशल मीडियावर 'मॉर्निंग बनाना डाएट' ट्रेण्ड बघायला मिळत आहे. या डाएटमध्ये लोक सकाळी उठून नाश्त्यात भरपूर केळी खातात. असं मानलं जात आहे की, या अनोख्या डाएटनं शरीराला आणि आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. पण अनेकांना अजूनही या मॉर्निंग बनाना डाएटबाबत माहिती नाही आणि याचे फायदेही माहीत नाहीत. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे मॉर्निंग बनाना डाएट?
वेब एमडीच्या एका रिपोर्टनुसार, मॉर्निंग बनाना डाएट एक जपानी डाएट प्लान आहे. ज्याची सुरूवात जपानच्या एका कपलनं केली होती. या डाएटमध्ये लोक सकाळी नाश्त्यात केळी खातात आणि त्यानंतर पाणी पितात. आपल्या क्षमतेनुसार लोक ३ ते ४ किंवा त्यापेक्षा जास्त केळी खातात. त्यानंतर दुपारचं आणि रात्रीचं जेवण लोक नेहमीप्रमाणे करतात. पण रात्री ८ वाजतानंतर काहीही खाण्यास मनाई आहे. तसेच रात्रीचं जेवण हे केवळ ८० टक्केच करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच जास्त जड आणि तेलकट खाणं टाळण्यास सांगितलं आहे.
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, मॉर्निंग बनाना डाएट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. केळींमध्ये नॅचरल शुगर, फायबर, पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. सकाळी केळी खाल्ल्यानं शरीरात लगेच एनर्जी मिळते आणि पोट जास्त भरलेलं राहतं. यानं शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि कॅलरी वेगानं कमी करण्यास मदत मिळते. ज्याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यास होतो. इतकंच नाही तर ही डाएट डायबिटीस, हाय कोलेस्टेरॉल, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजच्या रूग्णांसाठी फायदेशीर मानली जाते. मात्र, याबाबत आणखी रिसर्च करण्याची गरज आहे.
एक्सपर्टनुसार, मॉर्निंग बनाना डाएट सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल असं नाही. अनेकांना जास्त केळी खाल्ल्यानं काही समस्या होऊ शकते. त्याशिवाय सकाळी ही डाएट फॉलो कराल आणि नंतर दुपारचं व रात्रीचं जेवण हेल्दी नसेल तर डाएटचा प्रभाव पडत नाही. ही डाएट अशा लोकांसाठी जास्त फायदेशीर असते, ज्यांना वजन कमी करायचं असतं. जर तुम्हाला एखादा क्रॉनिक आजार असेल तर ही डाएट फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.