शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Marburg Virus : डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 12:45 IST

Marburg Virus : या व्हायरसचा धोका पाहता जवळपास १७ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Marburg Virus :  एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, हे त्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकते. दरम्यान, सध्या आफ्रिकन देश रवांडामध्ये मारबर्ग व्हायरस पसरला आहे. याठिकाणी या व्हायरसने मोठा कहर केला आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना याचा फटका बसला असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

या व्हायरसचा धोका पाहता जवळपास १७ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मारबर्ग व्हायरसमुळे लोकांच्या डोळ्यांतून पाण्यासारखे रक्त बाहेर येते. यामुळेच याला ब्लीडिंग आय व्हायरस  (Bleeding Eye Virus) असेही म्हणतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टनुसार, हा व्हायरस इबोला व्हायरस संबंधित आहे. त्यामुळे व्हायरल हेमोरेजिक तापही येतो. मारबर्ग व्हायरस लोकांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हा एक जुनोटिक व्हायरस आहे, म्हणजेच तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. हा विशेषता वटवाघळांपासून उद्भवतो आणि वटवाघळांच्या रक्त, मूत्र किंवा लाळेच्या संपर्काद्वारे मानवांमध्ये पसरते. हा व्हायरस सर्वात आधी १९६१ मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये आढळला होता.

या व्हायरसची लक्षणं काय आहेत?जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मारबर्ग  व्हायरसची लक्षणे इबोला व्हायरससारखी आहेत.जेव्हा या  व्हायरसचा संसर्ग होतो तेव्हा लोकांना खूप ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या, घसा खवखवणे, पुरळ उठणे आणि जुलाब यासारख्या समस्या होऊ शकतात. याशिवाय या त्रासामुळे अंतर्गत रक्तस्राव आणि अवयव निकामी होतात. या व्हायरसची लागण झाल्यावर अचानक वजन कमी होणे; नाक, डोळे, तोंड किंवा योनीतून रक्त येणे आणि मानसिक गोंधळ यांसारख्या समस्या उद्भवतात.

काय काळजी घ्यावी?मारबर्ग व्हायरस संक्रमित लोकांच्या संपर्कातून पसरतो. डॉक्टरांच्या मते, शरीरातील द्रवपदार्थांद्वारे तो इतर लोकांमध्ये पसरतो. हे टाळण्यासाठी, संक्रमित लोकांपासून दूर रहा. सामाजिक अंतर ठेवा, मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सInternationalआंतरराष्ट्रीयhospitalहॉस्पिटलWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना