शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या ठीक आधी मनुष्याला नेमकं काय जाणवतं? तज्ज्ञांनी सांगितलं मृत्यू देऊ लागतो हे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 10:40 IST

What happens when you die : एक डॉक्टर ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना मरताना पाहिलंय त्यांनी सांगितलं की, मृत्यूच्या ठीक आधी व्यक्तीच्या शरीरात काय बदल होऊ लागतात.

What happens when you die : जेव्हा कुणाचं निधन होतं तेव्हा कसं वाटतं? याबाबत क्वचितच कुणी आपलं मत देऊ शकेल. कारण या विषयावर फक्त तेच बोलू शकतात ज्यांनी मृत्यूचा अनुभव घेतला असेल. नुकतंच एक एक्सपर्टने सांगितलं की, मृत्यूआधी नेमकं काय होतं आणि कसं वाटतं? द एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एक डॉक्टर ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना मरताना पाहिलंय त्यांनी सांगितलं की, मृत्यूच्या ठीक आधी व्यक्तीच्या शरीरात काय बदल होऊ लागतात.

The Mirror च्या रिपोर्टनुसार, नैसर्गिक घटनांवर फार कमी रिसर्च उपलब्ध आहेत. मृत्यूआधी कसं वाटतं यावर बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, मृत्यूची प्रक्रिया सामान्यपणे हृदय बंद पडण्याच्या जवळपास दोन आठवड्यांपूर्वी सुरू होते. 

लिव्हरपूर यूनिव्हर्सिटीजमध्ये मानद रिसर्च फेलो सीमस कोयल यांनी द कन्वर्सेशनसाठी लिहिलेल्या लेखात मृत्यूच्या प्रक्रियेबाबत सांगितलं. ते म्हणाले की, 'मला वाटतं मृत्यूची प्रक्रिया कोणत्याच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या दोन आठवड्याआधी सुरू होते. यादरम्यान लोकांचं आरोग्य बिघडतं. त्यांना चालण्यात आणि झोपण्यात समस्या येऊ लागते. जीवनाच्या शेवटच्या क्षणात त्यांचं औषध घेणं, जेवण करणं किंवा काही पिण्याची क्षमताही संपते'.

सीमय कोयल म्हणाले की, 'हे तेव्हा होतं जेव्हा लोक म्हणू लागतात की, समोरची व्यक्ती मरत आहे आणि त्याच्याकडे जगण्यासाठी दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत. अनेक लोकांना ही प्रक्रिया एका दिवसातही दिसू शकते आणि काही लोक प्रत्यक्षात मृत्यूच्या दोन आठवड्यापूर्वीच मृत्यूच्या उंबरठ्यावर असतात. यादरम्यान परिवाराला बराच त्रास होतो.

मृत्यूवेळी शरीरात काय होतं? याबाबत जास्त लोकांना माहीत नसतं. पण काही रिसर्चचा अंदाज आहे की, मृत्यूवेळी मेंदूतून बरेच केमिकल्स निघतात, ज्यात एंडोर्फिनचाही समावेश आहे. हे कोणत्याही व्यक्तीच्या भावना उत्तेजित करतात.

सीमस कोयल यांच्यानुसार, मृत्यूच्या क्षणांना समजणं अवघड आहे, पण आतापर्यंत झालेल्या रिसर्चनुसार, जसजसा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो, शरीरातील स्ट्रेस केमिकल्समध्ये वाढ होते. कॅन्सर रूग्ण आणि इतरही लोकांच्या शरीरावर सूज येऊ लागते. हे असे रसायन आहेत जे तेव्हा वाढतात जेव्हा शरीर एखाद्या व्हायरलसोबत लढत असतात.

सामान्यपणे असं वाटतं की, मृत्यूच्या प्रक्रियेदरम्यान लोकांना वेदना कमी होतात. पण माहीत नाही असं का होतं.. हे एंडॉर्फिनशी संबंधित असू शकतं. 

पुढे ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू वेगवेगळ्या प्रकारे होतो. त्यामुळे अंदाज लावला जाऊ शकत नाही की, शांतीपूर्ण पद्धतीने कुणाचा मृत्यू होईल. मी असे अनेक तरूण लोक पाहिले आहेत ज्यांना अंदाजही नव्हता की, त्यांचा मृत्यू होणार आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सHealthआरोग्यDeathमृत्यू