शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Health Insurance Claim : आरोग्य विम्याचा ‘क्लेम’ नाकारला गेला तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 07:46 IST

जर तुमचा क्लेम नाकारला गेला, तर काय करता येईल; वाचा प्रक्रिया.

दिलीप फडके,ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते

Health Insurance Claim : शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी आरोग्य-विम्याचा क्लेम केला होता. दावा करण्यास उशीर झाला आहे असे कारण देत विमा कंपनीने तो नाकारला आहे. मी  विमा लोकपालाकडे अपील केले आहे... तिथेही न्याय मिळाला नाही तर मी काय करु शकतो ?  - एक वाचक

तुम्ही  खर्चाच्या प्रतिपूर्तीचा दावा केला आहे म्हणजेच तुमचा कॅशलेस विमा नाही. खर्चाच्या पावत्या सादर करुन खर्चाची प्रतिपूर्ती तुम्ही मागितली आहे. असा दावा शक्य तितक्या लवकर सादर करायला पाहिजे. उशीर झाल्यास  विलंबाचे कारण देणारा अर्ज विमा कंपनीकडे सादर करावा लागतो. साधारणतः प्रत्येक विमा कंपनीची स्वतःची एक अंतर्गत तक्रार निराकरण व्यवस्था असते.प्रथम त्या व्यवस्थेकडे आपले म्हणणे दाखल करुन देखील आपल्याला न्याय मिळाला नसेल तर मग विमा लोकपालांच्याकडे तक्रार करता येते.

विमा कंपनीचा निर्णय मान्य नसेल तर त्याबद्दल अपील करता यावे यासाठी ही लोकपालांची व्यवस्था निर्माण केलेली आहे. तिथे तुम्हाला  तुमची बाजू मांडावी लागेल. सामान्यतः त्या लोकपालांच्या तक्रारीवर निर्णय मिळण्यास फारसा उशीर होत नाही. तुमच्या मूळच्या दाव्यात काही त्रुटी नसेल किंवा दावा करण्यास उशीर झाला यापेक्षा अन्य कोणतेही कारण दावा नाकारण्यासाठी देता येत नसेल तर लोकपालांच्याकडे तुम्हाला न्याय मिळू शकतो.

लोकपालांचा निर्णय  विमा कंपनीवर बंधनकारक असतो. विमा कंपनी त्या निर्णयाच्या विरोधात अपील करु शकत नाही. ग्राहकाने हा निकाल मान्य केला तर त्याची तक्रार पूर्णतः मिटली आहे असे मानले जाते. 

पण ग्राहक त्याला मान्य नसलेल्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल करु शकतो. म्हणजेच लोकपालांचा निर्णय विमा कंपनीसाठी अंतिम आहे. पण तो निर्णय ग्राहकाच्या विरोधात असला.. किंवा दिला गेलेला निर्णय ग्राहकाला स्वीकारार्ह नसेल तर ग्राहक त्या निर्णयाच्या विरोधात ग्राहक न्यायमंचात किंवा सर्वसाधारण कोर्टात दाद मागू शकतो. विमा लोकपालांबद्दलची सविस्तर माहिती भारतीय बीमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाच्या https://www.irdai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी इमेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत