शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

- 100 डिग्री तापमानात विवस्त्र अवस्थेत केली जाते ही थेरपी; सेलिब्रिटी झालेयत क्रेझी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 11:49 IST

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी आजकाल लोकं अनेक थेरपींचा आधार घेत आहेत. त्यामधील काही थेरपी नॅचरल असतात तर काही केमिकल्स बेस्ड असतात.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी आजकाल लोकं अनेक थेरपींचा आधार घेत आहेत. त्यामधील काही थेरपी नॅचरल असतात तर काही केमिकल्स बेस्ड असतात. सध्या लोकांमध्ये एका थेरपीचं क्रेझ वाढताना दिसत आहे. फक्त सामान्य लोकंच नाही तर अनेक सेलिब्रिटीही या थेरपीचा आधार घेताना दिसत आहेत. ही थेरपी म्हणजे 'क्रायोथेरपी'. ही एक नॅचरल थेरपी असून सध्या फार ट्रेन्डमध्ये आहे. जाणून घेऊयात नक्की काय आहे  'क्रायोथेरपी' आणि तिचे शरीराला होणारे फायदे...

काय आहे क्रायोथेरपी?

क्रायोथेरपीमध्ये व्यक्तिला एका खोलीमध्ये प्रमाणापेक्षा कमी तापमानात ठेवण्यात येतं. या थेरपीला 'आइस पॅक थेरपी' किंवा 'क्रायो सर्जरी' म्हणून ओळखण्यात येतं. एवढ्या कमी तापमानाचा बॉडी, नसा आणि त्वचा यांवर सरळ परिणाम होतो. या थेरपीच्या मदतीने शरीराच्या पेशींमध्ये होणारी गडबड ठिक करण्यात येते. याव्यतिरिक्त शरीरात रक्तप्रवाह वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं.

कशी करतात क्रायोथेरपी?

क्रायोथेरपीमध्ये व्यक्तीला विवस्त्र अवस्थेत एका खोलीमध्ये बंद करण्यात येतं. त्यानंतर या खोलीमध्ये -100 डिग्रीच्या थंड वाफा जवळपास 4 ते 5 मिनिटांपर्यंत सोडण्यात येतात. या थंड वाफा शरीरावर पडल्या की शरीर विषारी पदार्थांना प्यूरिफाय करायचं काम करतं. 4 ते 5 मिनिटं थंड वाफा सोडल्यानंतर पुन्हा खोलीतलं तापमान गरम होऊ लागतं. त्यावेळी पुन्हा थंड वाफा सोडण्यात येतात. 

सेलिब्रिटींमध्ये पॉप्युलर आहे क्रायोथेरपी

हॉलिवुडच्या प्रसिद्ध मॉडेल्स आणि अभिनेत्री केट मॉस, जेसिका अल्‍बा, जेनिफर एनिस्टन, डेमी मूरे या सगळ्या जणी वर्कआउट केल्यानंतर कमीत कमी 3 मिनिटं तरी या थेरपीचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर कपूरचे ही थेअरपी करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. 

क्रायोथेरपी चे फायदे:

1. त्वचेसंबंधीच्या समस्यांपासून सुटका होते. 

2. शरीराच्या कोणत्याही भागावर जमा झालेले फॅट आणि सेल्युलाइट कमी करण्यासाठी या थेरपीचा वापर करण्यात येतो.

3. मायग्रेनमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठीही या थेअरपीचा उपयोग होतो. 

4. क्रायोथेरपीमुळे थकवा आणि सूज कमी करता येते. 

अशा परिस्थितीत क्रायोथेरपीचा वापर करू नका :

- दुखापत झाल्यावर

- हृदयाशी निगडीत आजार असल्यावर

- स्किन इन्फेक्शन असेल तर

- हाय ब्लड प्रेशर असेल तर

- थेरपीदरम्यान जास्त थंडी वाजली तर थेरपी घेणं थांबवा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य