शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

वजन घटवण्यासाठी Intermittent fasting करण्याआधी जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 12:02 IST

वजन कमी करण्यासाठी सध्य वेगवेगळ्या प्रकारचं डाएटिंग केलं जातं. त्यात खासकरून सेलिब्रिटींकडून केल्या जाणाऱ्या डायटिंगची फारच चर्चा असते.

(Image Credit : Skinny Ms.)

वजन कमी करण्यासाठी सध्य वेगवेगळ्या प्रकारचं डाएटिंग केलं जातं. त्यात खासकरून सेलिब्रिटींकडून केल्या जाणाऱ्या डायटिंगची फारच चर्चा असते. त्यात सर्वात जास्त लोकप्रिय आहे ते इंटरमिटेंट फास्टिंग. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकजण हे फॉलो करतात. अनेक डायटिशिअन याला वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग मानतात. पण या फास्टिंगचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. त्यामुळे हे डायटिंग सुरू करण्यापूर्वी ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. 

इंटरमिटेंट फास्टिंगचे फायदे 

वजन वेगाने कमी होतं

इंटरमिटेंट फास्टिंग अनेक टप्प्यांमध्ये केली जाणारी प्रक्रिया आहे. या फास्टिंगमध्ये व्यक्ती जेवण तर करतो पण दोन जेवणामध्ये अंतर फार जास्त ठेवतो. उदाहरणार्थ रात्री ७ वाजता काही खाल्लं तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता काहीतरी खावे, याने शरीराचा १३ तासांचा उपवास होतो. याने वजन कमी होण्यास मदत मिळते असा दावा केला जातो. 

(Image Credit : Steemit)

पचनक्रिया सुधारते

पोटाला अन्न पचवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण दिवसातून अनेकवेळा काहीना काही खात राहिल्याने असं होत नाही. इंटरमिटेंट फास्टिंगचा सर्वात मोठा फायदा हा सांगितला जातो की, याने पोटाला अन्न पचवण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. ज्यामुळे चरबी वाढण्याचा धोका कमी असतो आणि पचनक्रियाही मजबूत होते. 

डायबिटीसचा धोका कमी

इंटरमिटेंट फास्टिंगने इन्सुलिन लेव्हलही कंट्रोल करण्यास मदत मिळते. ज्यामुळे फॅट बर्न होते. या प्रक्रियेमुळे डायबिटीस होण्याचा धोकाही कमी असतो. 

त्वचेला फायदा

फास्टिंगमुळे जेव्हा पचन चांगलं होतं तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर पडण्यास सोपं होतं. टॉक्सिन जेव्हा शरीरात नसतात तेव्हा याचा सर्वात जास्त फायदा त्वचेला होतो. इंटरमिटेंट फास्टिंकदरम्यान लिक्विडही भरपूर घेतलं जातं. ज्याने त्वचेवर ग्लो येतो.

हृदय राहतं हेल्दी

काही रिसर्चनुसार, इंटरमिटेंट फास्टिंगमुळे हृदय हेल्दी ठेवण्यासाठी मदत मिळते. या प्रक्रियेमुळे ब्लड शुगर लेव्हल, कोलेस्ट्रॉल, फॅट इत्यादी कंट्रोल करण्यास मदत मिळते. या गोष्टी हृदयासाठी चांगल्या नसतात. अशात या गोष्टी कंट्रोल केल्यास हृदय हेल्दी राहतं. 

इंटरमिटेंट फास्टिंगचे नुकसान

ओव्हरइटिंग

इंटरमिटेंट फास्टिंग करणे इतं सोपं नाहीये. दोन जेवणामध्ये १२ किंवा त्यापेक्षा जास्त वेळाचं अंतर ठेवल्याने शरीर अन्न पूर्णपणे पचवतं, पण अशात भूक जास्त लागते. ज्यामुळे ओव्हरइटिंगचा धोकाही वाढतो. 

कमजोरी

इंटरमिटेंट फास्टिंगमुळे तुम्हाला कमजोरी येऊ शकते. सायंकाळपासून ते सकाळपर्यंत उपाशी राहिल्याने शरीरात एनर्जी जनरेट करण्यासाठी आवश्य तत्त्वांची कमतरता भासते. त्यामुळे कमजोरी येऊ शकते. 

मूड खराब

(Image Credit : Everyday Power)

खाण्याचा आणि मूडचा खोलवर संबंध असतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, उपाशी राहिल्याने व्यक्तीची चिडचिड वाढते. असंच इंटरमिटेंट फास्टिंगवेळी होतं. तुम्हाला भूक लागते, पण तुम्ही काही खाऊ शकत नाहीत. आणि अशात काही खाल्लं तर मूडसोबतच कामावरही वाईट प्रभाव पडतो. 

झोपेची कमतरता

जर पोट पूर्णपणे भरलेलं नसेल तर चांगली झोप न येण्याची समस्या होते. अनेकदा असंही होतं की, व्यक्तीचं शरीर दिवसभर इतकी मेहनत करत असतो की, सायंकाळी जेवण केल्यावरही रात्री उशीरा त्याला भूक लागते. पण इंटरमिटेंट फास्टिंग फॉलो करत असल्याने व्यक्ती काही खात नाही, ज्यामुळे त्याला झोपेशी संबंधित समस्या होऊ शकतो. 

डिहायड्रेशन

(Image Credit : KERA News)

इंटरमिटेंट फास्टिंगच्या कारणाने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. जेव्हा आपण काही खात नाही, तेव्हा तहान लागणेही कमी होतं. त्यामुळे शरीरात पाण्याचा प्रमाण कमी होऊ शकतं. 

(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. याकडे प्रोफेशनल सल्ला म्हणूण बघता येणार नाही. त्यामुळे डाएटमध्ये काहीही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाही शरीर रचना वेगळी असते, अशात सर्वांनाच ही प्रक्रिया फायदेशीर ठरेल असे नाही. तसेच वरील गोष्टींनी सर्वांनाच फायदा होतो असा दावाही आम्ही करत नाही.) 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार