शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वॉकिंग की रनिंग: वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज चांगली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 12:14 IST

जेव्हा विषय वजन कमी करण्याचा येतो तेव्हा डाएटसोबतच वर्कआउट करणंही गरजेचं असतं.

(Image Credit : Skinny Runner)

जेव्हा विषय वजन कमी करण्याचा येतो तेव्हा डाएटसोबतच वर्कआउट करणंही गरजेचं असतं. कारण तुमचं वजन तेव्हाच कमी होईल जेव्हा तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होतील आणि कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्हाला वर्कआउट किंवा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. वर्कआउट दोन सर्वात सोप्या आणि लोकप्रिय पद्धती आहेत वॉकिंग आणि रनिंग. पण या दोन्हींपैकी वजन कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं असा प्रश्न अनेकांना पडतो. याचंच उत्तर आज मिळवूया.

कोणत्या वर्कआउटने कॅलरी बर्न होतात?

(Image Credit : Runner's World)

मोठ्या संख्येने लोक सकाळी आणि सायंकाळी वॉकिंग आणि जॉगिंग करताना बघायला मिळतात. पण जे वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करत असतात, ते अनेकदा कन्फ्यूज असतात की, कमी वेळेत वजन कमी करण्यासाठी त्यांनी वॉकिंग करावं की रनिंग? असा विचार मनात येण्यात कारण म्हणजे अनेकांना असं वाटतं की, चालण्याच्या तुलनेत धावल्याने जास्त कॅलरी बर्न होतात. पण सत्य काय आहे हे जाणून घेऊ...

रिसर्च काय सांगतो ? 

मेडिसिन आणि सायन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एक सर्व्हे साधारण ६ वर्षे करण्यात आला. ज्यात रनिंग करणाऱ्या ३० हजार लोकांसोबत आणि वॉकिंग करणाऱ्या १५ हजार लोकांसोबत चर्चा करून डेटा एकत्र करण्यात आला. यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, या दोनपैकी कोणत्याही गटाने जास्तीत जास्त वजन कमी केलं आणि कुणी वजन कायम ठेवलं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, वॉकिंग आणि रनिंग दोन्ही गटाने दर आठवड्यात बरोबरीत कॅलरी बर्न केल्यात. पण रनिंग करणाऱ्या गटामध्ये असेही लोक होते, जे त्यांचं वजन कंट्रोल करण्यात आणि जास्त काळासाठी कामय ठेवण्यात यशस्वी ठरले. 

वर्कआउटनंतरही कॅलरी बर्न होतात

असं यासाठी कारण high intensity एक्सरसाइजचे परिणाम नॉर्मल वर्कआउटच्या तुलनेत जास्त आणि दीर्घ काळासाठी बघायला मिळतात. high intensity एक्सरसाइज किंवा वर्कआउटच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आरामाच्या मुद्रेत असता त्यावेळी सुद्धा कॅलरी बर्न होत राहतात. कारण फार जास्त तीव्रता असलेल्या एक्सरसाइज दरम्यान तुमचा मेटाबॉलिज्म रेट वाढतो आणि एक्सरसाइज करण्याच्या १४ तासांनंतरही शरीरातील कॅलरी बर्न होत राहतात.  

जे पसंत असेल ते करा

यातून हे स्पष्ट झालं आहे की, वजन कमी करण्यासाठी वॉकिंगपेक्षा रनिंग अधिक फायदेशीर असते. पण तरी सुद्धा जर तुम्हाला वॉकिंग जास्त पसंत असेल तर तुम्ही वॉकिंग करायला हवं. कारण अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, व्यक्तीला जी गोष्ट पसंत असते ती तो नियमित करू शकतो. त्यामुळे जे आवडतं ते करावं. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स