शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 5 दिवसांतच 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा अॅपल डाएट प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 14:10 IST

सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून सगळीकडेच जोरदार तयारी सुरू आहे. अशातच तुम्हीही त्यासाठी प्लॅनिंग करत असालच. अरे बापरे काय सांगताय? वेडिंग सिझनमध्ये वाढलेल्या वजनामुळे तुम्ही तुमचा फेवरेट ड्रेस वेअर करू शकत नाही.

सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून सगळीकडेच जोरदार तयारी सुरू आहे. अशातच तुम्हीही त्यासाठी प्लॅनिंग करत असालच. अरे बापरे काय सांगताय? वेडिंग सिझनमध्ये वाढलेल्या वजनामुळे तुम्ही तुमचा फेवरेट ड्रेस वेअर करू शकत नाही. इतकचं ना.... अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पाच दिवसांच्या एका स्पेशल डाएटसंदर्भात. हे डाएट फॉलो करून तुम्ही जवळपास 3 किलो वजन कमी करू शकता. या डाएटचं नाव आहे 'अॅपल डाएट प्लॅन'. जाणून घेऊयात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कसं परिणामकारक ठरतं हे डाएट. अॅपल डाएट हे प्रामुख्याने सफरचंदावर अवलंबून असलेलं डाएट आहे. सफरचंदाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामुळे दररोजच्या आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते. 

अॅपल डाएट म्हणजे काय?

या डाएटनुसार, तुम्हाला आहारामध्ये जास्तीतजास्त सफरचंदांचा समावेश करावा लागतो. पहिल्या दिवशी डाएटीशियन फक्त एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवणं आणि रात्रीच्या जेवणामध्ये सफरचंद खाण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यानंतर उरलेले तीन दिवस तुम्हाला तुमच्या आहारात फळं, ज्यूस, भाज्या, प्रोटीन आणि डेअरी प्रोडक्टचा समावेश करणं गरजेचं असतं. 

कसं कमी होतं वजन?

सफरचंद मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे तुम्हाला फक्त 80 ते 100 कॅलरी मिळतात. सफरचंद नर्वस सिस्टिमसाठीही फायदेशीर ठरतं. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जेवणाआधी एक सफरचंद खाल्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते. 

अॅपल डाएटचा पहिला दिवस :नाश्ता - 2 सफरचंद दुपारचं जेवण - 1 सफरचंद रात्रीचं जेवण - 3 सफरचंद

अॅपल डाएटचा दुसरा दिवस :नाश्ता - 1 सफरचंद, एक ग्लास सोया मिल्कदुपारचं जेवण - 1 सफरचंद, सलाड, व्हेजिटेबल ज्यूसरात्रीचं जेवण - 2 सफरचंद

अॅपल डाएटचा तिसरा दिवस :नाश्ता - 1 सफरचंद दुपारचं जेवण - 1 सफरचंद, सलाडसंध्याकाळचा नाश्ता - एक कप दहीरात्रीचं जेवण - 2 सफरचंद, सलाड आणि सूप 

अॅपल डाएटचा चौथा दिवस :नाश्ता - 1 सफरचंद, केळ्याची स्मूदीदुपारच्या जेवणाआधी - एक वाटी कलिंगड किंवा संत्रीदुपारचं जेवण - 2 सफरचंद, भाजी आणि सूप रात्रीचं जेवण - 1 सफरचंद आणि बीटाची स्मूदी

अॅपल डाएटचा पाचवा दिवस :नाश्ता - 1 सफरचंद आणि 1 उकडलेलं अंडदुपारच्या जेवणाआधी - 2 बदाम आणि 1 पीच दुपारचं जेवण - 1 सफरचंद आणि भाजीसंध्याकाळचा नाश्ता -  1 कप ग्रीन टीरात्रीचं जेवण - 1 सफरचंद आणि स्प्राउट्स 

या गोष्टी लक्षात ठेवा :

वजन कमी करण्यासाठी जेवढं डाएट गरजेचं असतं तेवढाच व्यायामही आवश्यक असतो. त्यामुळे अॅपल डाएटसोबतच दररोज वर्कआउट करणंही गरजेचं आहे. याव्यतिरिक्त दिवसभर भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे डाएट फॉलो करण्याआधी डाएटीशियनचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे :

  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 
  • कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी
  • डायबिटीजचा धोका कमी
  • पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी 

 

टीप : प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते. त्यामुळे कोणतंही डाएट फॉलो करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य