शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात या पदार्थांमुळे वाढत वजन, वाढू नये म्हणून फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 21:35 IST

पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे.

पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही खाच. याचा पुरेपुर आनंद घ्या पण आरोग्याकडे लक्ष देऊन. असे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे तुमचे वजनही जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे वेळीच तोंडाला आवर घाला.

सिझनल फळे खापावसाळ्यात अनेक प्रकारची फळे मिळतात. ही तुमच्या फिटनेससाठी अत्यंत महत्वाची असतात. ही फळे अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतात. याचा वजन कमी करण्यात फायदा होतो. त्यामुळे पावसाळ्यात चिकू, लीची, जांभळ अशी फळं खा. ही फळं खाल्ल्याने तेलकट पदार्थ खाण्याची तल्लफही कमी करतात. तसेच ही पावसाळ्या दरम्यान तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात.

थोडं थोडं खापावसाळ्यात तुमच्या घरी गरमागरम भज्या बनत असतील. तुम्ही त्या नक्की खा पण एकाचवेळेत सर्व संपवू नका. थोडं थोडं खा. यामुळे हे पदार्थ सहज पचतात व भुकही कमी लागते. तसेच तुम्ही हे फक्त आठवड्यातून एकदाच खाण्याचा प्रयत्न करा.

भरपूर पाणी प्यापावसाळा आहे म्हणून तहान कमी लागते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाणी पिणे कमी केले पाहीजे. भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सीन्स बाहेर फेकले जातात. तसेच तुम्हाला भूकही कमी लागते.

हेल्दी सुप प्यापावसाळ्यात तुम्हाला काही गरमागरम खाण्याचे मन करतच असेल तर तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा भाज्यांचे गरमागरम सुप प्या. लक्ष ठेवा की तुम्ही यात मसालेदार पदार्थांचा वापर करत नाही आहात.

कमी साखरेची चहापावसाळ्यात आल्याचा चहा म्हणजे आनंदच. पण वारंवार चहा प्यायची सवय असेल तर त्यात साखर कमी टाका किंवा टाकूच नका. साखरेमुळे तुमचे वजन वाढते. त्यामुळे पावसाळ्याच आल्याचा चहा प्याच पण साखरेपासून दूर राहा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स