शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

​दिवाळीत वजन वाढलंय...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 18:20 IST

दिवाळी म्हणजे नवनवीन खाद्य-पदार्थांची मेजवानीच असते. त्यात स्वीट, मिठाई, शंकरपाडे आदी गोड पदार्थ तसेच तेल-तुपात तळलेल्या चकल्या, कारंज्या आदींमुळे नक्कीच वजन वाढते. ....

- Ravindra Moreदिवाळी म्हणजे नवनवीन खाद्य-पदार्थांची मेजवानीच असते. त्यात स्वीट, मिठाई, शंकरपाडे आदी गोड पदार्थ तसेच तेल-तुपात तळलेल्या चकल्या, कारंज्या आदींमुळे नक्कीच वजन वाढते. आपण वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या पुढे वाढत जाते आणि विविध आजारांना आमंत्रण मिळते.  वाढलेले वजन कसे कमी करावे याबाबत आजच्या सदरात आपण जाणून घेऊया...नियोजन कराजर आपण वजन कमी करण्याचे नियोजन नाही केले तर आपले वजन कधीही कमी होणार नाही. एक उद्दिष्ट ठरवा आणि त्यानुसार प्लॅन बनवा. किती दिवसात किती किलो वजन कमी करु शकता. मात्र, हा प्लॅन बनवित असताना आपण स्वत:ला कोणत्याही समस्येत अडकवू नका. खूप झोपाबरेचजण असे समजतात की, जास्त झोपल्याने वजन वाढते, मात्र नव्या संशोधनानुसार झोपेमुळे वजन कमी होत असते. जर आपण ७ ते ८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर त्यामुळे जास्त भूक लागते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खातो. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.स्नॅक्स खाणे टाळाकित्येकजण जेवणदेखील चारवेळा करतात आणि स्नॅक्सदेखील खातात. जर आपणास वेळोवेळी स्नॅक्स खाण्याची सवय असेल, तर जेवणाचे प्रमाण थोडे कमी करा. यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात आणि पर्यायाने वजनदेखील वाढते. खाण्याचे प्रमाण ठरवाबहुतेकजण दिवसभर खातच असतात आणि त्यांना माहितदेखील नसते, की त्यांनी किती प्रमाणात जेवण केले. यासाठी आपण दिवसभरात किती खाणार याचे प्रमाण ठरवून घ्या. भरपूर चालाकार आणि मोटारसायकल असल्याने बरेचजण चालतच नाहीत. वजन कमी करण्यासाठी भरपूर चाला तसेच पायºयांचादेखील प्रयोग करा. त्याचप्रमाणे आपला मनपसंत खेळ खेळा. अतिरिक्त कॅलरी हटवा६५ टक्के लोग शुगर असणारी पेये किंवा कोल्ड्रिंक्स भरपूर पितात. यामुळे पोट भरत नाही, मात्र अतिरिक्त कॅलरीज मिळतात.   जड वजन उचलाआपण पुरुष असो वा महिला, जड वजन उचलल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बर्न होतात.व्यायामात विविधता आणाएका दिवसात अनेक प्रकारचे व्यायाम करा, जसे पाच मिनिट कार्डिओ ट्रेडमिल, बाइक केल्यानंतर लगेच डंबेल सर्किट, स्ट्रेचिंग आणि बेंच ओवर करा. हा व्यायाम सातत्याने आठ वेळेस करा. कार्बोहायड्रेट्स हटवावजन कमी करायचे असेल तर आहारातून पास्ता, भात आणि बे्रड आदी वस्तूंना हटवा आणि त्याऐवजी फळे आणि भाजीपाला यांचा समावेश करा. अशाने आपण कितीही खाल्ले तरी वजन वाढणार नाही. साध्या गोष्टींचा वापर कराजर आपणाकडे जिम जाण्यासाठी पैसे किंवा वेळ नसेल तर आपण घरीच दोरी उड्या मारा. अगोदर ५० वेळा उड्या मारा नंतर वाढवून १०० वेळा मारा. जास्त आराम नकोव्यायाम करतेवेळी फक्त १० ते ३० सेकंदापर्यंतच आराम करा. यावेळी जास्त आराम नको. उपवास कराआपण जर दिवसातून दोन किंवा तीन वेळेस जेवण करत असाल तर आठवड्यातून एक दिवस उपवास करणे गरजेचे आहे. अशाने आपण सहज आणि आरामाने आपले वजन कमी करु शकाल. प्रोटीन जास्त खाप्रोटीन जास्त खाल्ल्याने मांसपेशी बनतात आणि यामुळे शरीरातील फॅट बर्न होते. शिवाय पोटदेखील भरलेले असते. पाणी भरपूर प्या आपण दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे आपल्याला जास्त भूक लागणार नाही आणि पोटदेखील भरलेले असेल. तसेच जेवणाअगोदर एक ग्लास पाणी प्यायला हवे, यामुळे नक्कीच वजन कमी होईल.