शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का?; प्रवासात मास्क वापराचा की नाही, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:42 IST

CoronaVirus : श्वास घ्यायला त्रास होणं, गुदमरणं, दम लागणं अशा समस्यांचा जाणवतात.

कोरोनापासून बचावासाठी जोपर्यंत लस किंवा प्रभावी औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. सध्या सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर केल्याशिवाय कोरोनापासून बचाव करणं कठीण आहे. अमेरिकेतील सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासाठी दिर्घकाळपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग, स्वच्छता या गोष्टींकडे लक्ष देत जगावं लागणार आहे.

भारतासारख्या अनेक देशात वातावरणातील बदलांमुळे मास्कचा वापर केल्याने चालण्या फिरण्याासाठी समस्यांचा सामना करावा लागतो. श्वास घ्यायला त्रास होणं, गुदमरणं, दम लागणं अशा समस्यांचा जाणवतात. पण आपण जेव्हा खासगी वाहनांतून किवा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करतो तेव्हा मास्क लावायला हवा की नाही. याबाबत माहिती देणार आहोत. मास्कच्या वापराबाबत काही गोष्टी माहीत असल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागणार नाही. 

मास्कचा वापर कितपत सुरक्षित

आजकाल रस्त्यावर सर्वच व्यक्ती मास्क लावून वावरताना दिसून येतात. किंवा कारमध्ये बसलेली माणसंसुद्धा आपल्या तोंडाला मास्क लावतात. काही लोक कारमध्ये बसल्यानंतर मास्क लावून ठेवत नाहीत. तुम्ही सुद्धा विचार करत असाल कार चालवतानाही मास्क वापरणं गरजेचं आहे का? जर एखादी व्यक्ती आपल्या कारमध्ये एकटी असेल तर मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. घरातील व्यक्तींशिवाय इतर व्यक्ती कारने प्रवास करताना सोबत असतील तर  दोघांनीही मास्क लावणं गरजेचं आहे. 

तुम्ही घरच्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसोबत प्रवास करत असाल तर कारमध्ये मास्कचा वापर करायलाच हवा. याशिवाय कारमध्ये एयर कंडीशनर "रीसर्क्युलेशन" सेटिंगमुळे एसीच्या हवेने कोरोनाचं संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा. 

 तुम्ही आजारी असाल तर इतरांसोबत प्रवास करणं टाळा. कारण तुमच्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. सौम्य सर्दी, खोकला किंवा शिंका येत असतील तर मास्कचा वापर  करा. जर तुम्ही कमी अंतरावरच्या प्रवासासाठी एकटे जात असाल तर मास्कचा वापर टाळला तरी चालू शकेल.

CoronaVirus : १५ ऑगस्टआधीच कोरोनापासून 'स्वातंत्र्य' मिळणार; 'भारत' अन् ICMR लस आणणार!

मेड इन इंडिया! अखेर भारताने 'अशी' तयार केली कोरोनाचा खात्मा करणारी लस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य