शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा 'या' पद्धतीने पुन्हा करा वापर, तुम्हालाही नसेल माहीत फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 09:28 IST

Tea bag reuse tips : अनेकांना हे माहीत नसतं की, वापरलेल्या टी बॅगचे बरेच फायदे मिळू शकतात. त्याचा वापर कसा करायचा हेच आज आम्ही सांगणार आहोत.

Tea bag reuse tips : बरेच लोक आजकाल वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ग्रीन टी चं सेवन करतात. एक्सपर्ट सांगतात की, यातून अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात आणि शरीरातील चरबीही कमी होते.  ग्रीन टी चं सेवन केल्यावर कुणीही टी बॅग लोक फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वापरलेल्या टी बॅगचे बरेच फायदे मिळू शकतात. त्याचा वापर कसा करायचा हेच आज आम्ही सांगणार आहोत.

दुर्गंधी पळवा

अनेकदा कपाटामधून दुर्गंधी येते. त्यामुळे कपड्यांचाही वास येऊ लागतो. अशात ही दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी बॅगचा वापर करू शकता. ग्रीन टी बॅग उघडून उन्हात वाळत घाला आणि नंतर त्यातील पावडर एका कॉटनच्या कपड्यात बांधून कपाटात ठेवा. याने दुर्गंधी दूर होईल.

झाडांना पोषण

घरात लावलेल्या झाडांना पोषण देण्यासाठी तुम्ही ग्रीन टी बॅगचा वापर करू शकता. याने झाडांची चांगली वाढ होते. त्यासोबतच वाळलेल्या ग्रीन टी पावडरचा वापर तुम्ही फ्रिजची दुर्गंधी दूर करण्यासाठीही वापरू शकता.

केसांची चमक वाढवा

ग्रीन टी च्या माध्यमातून तुम्ही तुमचे केसही चमकदार करू शकता. केस चमकदार करण्याची ही एक सोपी पद्धत आहे. यासाठी 1 ग्लास पाण्यात टी बॅग उकडून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर याने केस धुवा. याने केसांना चांगलं पोषणही मिळेल.

त्वचेसाठी फायदेशीर

तुम्ही सकाळी ग्रीन टी चं सेवन करत असाल तर तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळते आणि याने तुमची त्वचाही डिटॉक्स करण्यास मदत मिळते. त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा वापर करू शकता. टी बॅग्सचा तुम्ही डार्क सर्कल, लालसरपणा आणि सूजलेले डोळे यापासून सुटका मिळवण्यासाठी वापर करू शकता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य