शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणी हे जीवन;पण किती प्यावे दिवसभरात?बघा तज्ज्ञ काय सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:31 IST

बरेचदा सांगितले जाते की भरपूर पाणी पित रहा. त्यामुळे अनेक रोग दूर पळून जातात. मात्र, दिवसभरात पाणी प्यायला पाहिजे याला मर्यादा आहेत का?

पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाणी आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यात महत्वाची भूमिका बजावते. उन्हाळ्यात गर्मी वाढल्याने आपल्याला सतत तहान लागत राहते व आपण सतत पाणी पित राहतो.  असे बरेचदा सांगितले जाते की भरपूर पाणी पित रहा. त्यामुळे अनेक रोग दूर पळून जातात. मात्र, दिवसभरात पाणी प्यायला पाहिजे याला मर्यादा आहेत का? याबाबत डॉक्टरांनी, तज्ज्ञ मंडळींनी मर्यादा आखून दिलेली आहे. विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन आपण पाणी पित राहिलो तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणजे पाणी हे उपायकारी ठरण्याऐवजी ते अपायकारी ठरू शकेल. म्हणूनच पाणी पितानाही पुरेशी काळजी घ्या. 

शरीरासाठी किती पाणी पिणे आवश्यक?यूएस नॅशनल अ‍ॅकेडमिक्स ऑफ सायन्स, इंजीनियरिंग आणि मेडीसिननुसार, एका महिलेच्या शरिरात दररोज ११.५कप पाणी जाणे आवश्यक आहे. ११,५ कप म्हणजेच साधारण २.७ लिटर पाणी. तर एखाद्या पुरुषाला १५.५ कप पाण्याची आवश्यकता असते. याचा अर्थ दिवसभरात पुरुषाच्या शरीरासाठी जवळपास ३.७ लिटर पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच काय, तर याच मर्यादेनुसार महिला वा पुरुषाने पाणी प्यायला हवे. ही मर्यादा ओलांडली तर पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जे पाणी आपल्या शरिरातील व्याधी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते, ते पाणी मर्यादेपेक्षा अधिक प्यायला मिळाल्यामुळे नको त्या व्याधींना निमंत्रण देऊ शकते. आपल्या शरीरात पाण्याची काही प्रमाणात मात्रा ही ज्यूस आणि जेवणातून पूर्ण होते. आपण पाण्याची २० टक्के आवश्यकता ही आपल्या नियमित जेवणातूनच पूर्ण करतो.

पाण्याची आवश्यकता खालील गोष्टीवर अवलंबूनवर नमूद केलेली पाण्याची आवश्यकता ही प्रत्येक माणसाच्या शरिरासाठी सारखीच असेल, असे नाही. प्रत्येकाचे शरिर वेगळे असते, त्यानुसार प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असते की त्या व्यक्तीला पाण्याची किती गरज आहे. व्यक्तीचे खाणेपिण्याचे पदार्थ, त्याची जीवनशैली, वातावरणीय गोष्टी यावरदेखील पाण्याची आवश्यकता अवलंबून असते. एका अहवालानुसार, तुम्ही कुठे राहता, तुम्ही किती तापमानात राहता, तुमच्या भोवतालचे वातावरण कसे आहे, तुम्ही किती अ‍ॅक्टिव्ह आहात, तुमचे आरोग्य, प्रेग्नन्सी आदी गोष्टींवरही पाण्याची गरज अवलंबून असते. 

जास्त पाणी पिणे धोकादायकगरजेपेक्षा अधिक पाणी पिण्याने आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारचे परिणाम होतात. एका अहवालांनुसार, जास्त पाणी पिण्याने शरीरातील सोडियमच्या प्रमाणावर परिणाम होतो. इलेक्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे डायबिटीज, ह्रदयाशी संबंधित विकार तसेच हार्मोन्सवर परिणाम होण्याची भिती असते. त्यामुळे शरिराच्या गरजेनुसारच पाणी प्या, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स