Alcohol Addiction : दारू आज एन्जॉय करण्याचं साधन बनली आहे. नेहमीच लग्न, पार्टी, क्लब, बार इत्यादींमध्ये लोक ओकेजननुसार दारूचं सेवन करतात. काही लोक तर रोज दारूचं सेवन करतात. हे सगळ्यांनाच माहीत आहे की, जास्त दारू पिणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. तरीही बरेच लोक नियमितपणे दारूचं सेवन करतात.
जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही खूप जास्त दारू पिता आणि तुमचं शरीर काही संकेत देत असतात. जे डॉक्टरांनी सांगितले आहेत. या संकेतांद्वारे तुम्ही स्वत: अंदाज लावू शकता की, तुम्ही खूप जास्त पित आहात आणि पिणं कमी करण्याची गरज आहे. चला जाणून घेऊ ते संकेत. नॅशनल हेल्थ सर्विसने दारूच्या धोक्यांना कमी करण्यासाठी पुरूष आणि महिला व महिलांसाठी एका आठवड्यात 14 यूनिटपेक्षा जास्त दारू पिण्याचा सल्ला देतात.
दारूडे झाल्याचे संकेत
- दररोज दारू पिणं
- रोज ठरलेल्या प्रमाणात दारू पिणं
- ज्या पार्टीत दारू आहे फक्त तिथे जाणं
- दिवसाही रोज दारू पिणं
- दुसऱ्यांना दारू पिताना न बघून दु:खी होणं
- ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त पिणं
दारूची सवय
डॉ. निलोल्सने द सनला सांगितलं की, दारूची सवय तेव्हा लागते जेव्हा व्यक्तीला दारू पिण्याची अनियंत्रित इच्छा होते आणि त्यांना असं वाटतं की, त्यांचं शरीर केवळ दारूवर अवलंबून आहे. जर त्यांनी दारू पिणं बंद केलं तर दारू पिणं बंद केलं तर त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.
डॉ. निकोल्स यांनी सांगितलं की, ज्या लोकांना दारूची सवय लागते त्या लोकांच्या पोटात वेदना, डिप्रेशन, एंझायटी, त्वचेचा नुकसान, झोपण्यात समस्या, चिडचिडपणा आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या होऊ शकतात. हे सुरूवातीचं संकेत आहे की, तुम्ही दारू कमी केली पाहिजे.
'जर कुणी वर सांगितल्याप्रमाणे खूप जास्त दारू पित असेल तर त्यांना पुढे जाऊन लिव्हरसंबंधी आजार, हृदयरोग, डायबिटीस आणि मेंटल हेल्थसंबंधी आजारांचा सामना करावा लागू शकतो. हे फार सायलेंट आजार असतात. हे अचानक एकाएकी समोर येतात आणि मोठं नुकसान करून जातात'.
अशात ज्या लोकांना वाटतं की, ते जास्त दारू पित आहेत, त्यांनी लगेच डॉक्टरांना भेटावं आणि आपल्या समस्या सांगाव्या. याने दारूची सवय सोडवण्यास मदत मिळू शकेल.