वारली पेंटिंग चितारत जाणून घेतली संस्कृती सखींचा कलासक्त : लोकमत सखी मंच, किड्झी प्री स्कूल, र्शी आर्ट्सचा उपक्रम
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:43+5:302015-03-14T23:45:43+5:30
सोलापूर :

वारली पेंटिंग चितारत जाणून घेतली संस्कृती सखींचा कलासक्त : लोकमत सखी मंच, किड्झी प्री स्कूल, र्शी आर्ट्सचा उपक्रम
स लापूर : भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक प्रसंगाला, सण-उत्सवाला अनुसरुन लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी वारली पेंटिंग चितारत भारतीय संस्कृती जाणून घेतली़ निमित्त होते जागतिक महिला दिनाच़े महिलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने किड्झी प्री स्कूलमध्ये दोन दिवसीय वारली पेंटिंगचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता़ लोकमत सखी मंच, किड्झी प्री स्कूल आणि र्शी आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता़ याप्रसंगी अभिजित भडंगे, किड्झीच्या र्शुती कोंगनोळीकर, डॉ़ गौरी कहाते, र्शीकांत गोचिडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी या प्रमुख अतिथींच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्व़ जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन केले गेल़े लग्न, बारसे, मूंज अशा अनेक विधी, प्रसंगांशी निगडित वारली पेंटिंग साकारता येत़े सिद्धेश्वर यात्रा आणि अक्षता सोहळा या पेंटिंगमधून साकारण्याचा प्रयत्न सखींनी केला़ प्राथमिक माहिती आणि डिझाईनमध्ये सखी भान हरपून प्रशिक्षण घेतल़े(प्रतिनिधी)़350 प्रसंगांवर आधारित डिझाईनप्रत्येक प्रसंगावर आधारित वारली पेंटिंग साकारता येत़े जवळपास 350 प्रसंगांवर आधारित वारली पेंटिंग कशी साकारु शकतो याबाबत मुख्य प्रशिक्षक गोसावी यांनी मार्गदर्शन केल़े तसेच गीता कोनाळे, रेश्मा शहा, सोनिया शहा, अविनाश पवार यांनी वारली पेंटिंगबाबत प्रशिक्षण दिल़े यातील बहुतांश प्रकार दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेतून आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला़ -------------------------फोटो - 6 मार्च रोजी न्यूजरॅपवरलोकमत सखी मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ़ गौरी कहात़े डावीकडून किड्झीच्या र्शुती कोंगनोळीकर, प्रशिक्षक विकास गोसावी, र्शीकांत गोचिड़े कृपया लोकमत सखी मंचचा लोगो वापरावा़