शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मागच्या खिशात पाकीट ठेवून बसणे असे पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 17:49 IST

ज्याचं पाकीट जितकं जास्त मोठं तितका तो व्यक्ती मोठा असणार, असे मानले जाते. अनेकजण छोट्याशा पाकिटात पैशांसोबत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हिजिटींग कार्ड, लायसन्स

मुंबई : ज्याचं पाकीट जितकं जास्त मोठं तितका तो व्यक्ती मोठा असणार, असे मानले जाते. अनेकजण छोट्याशा पाकिटात पैशांसोबत क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, व्हिजिटींग कार्ड, लायसन्स, आयडी प्रूफ आणि इतरही काही गोष्टी ठेवतात. पण या इतक्या गोष्टी ठेवून तुम्ही अनेक अडचणींना निमंत्रण देताय. डॉक्टरांनुसार तुमच्या पॅंटच्या मागच्या खिशात आरामात ठेवलेल्या या पाकिटामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

1) सोसायटी फॉर अल्जायमर अॅन्ड एजिंग रिसर्चचे जनरल सेक्रेटरी धिकव सांगतात की, मागच्या खिशात ठेवलेलं वजनी, जाडजूड पाकीट तुमच्या हिप जॉईंट आणि कमरेच्या खालच्या भागात त्रास निर्माण करु शकतं. कमरेत एक सायटीका नावाची नस असते. जेव्हा आपण हे जाड पाकीट मागच्या खिशात ठेवून बसतो, तेव्हा सायटीका नस दबली जाते. ही नस दबली गेल्याने हिप जॉईंट आणि कमरेच्या खाली दुखणं सुरु होतं. 

2) रोज याप्रकारचं दुखणं होत असेल तर याला पिरीफोर्मिंस सिंड्रोम म्हटले जाते. मागच्या खिशात जाड पाकीट ठेवल्याने तुमचा पार्श्वभाग एका बाजूला झुकला जातो. त्यामुळे तुमच्या पाठिच्या कण्यावर अधिक भार पडतो. सरळ बसण्याऐवजी कमरेच्या खालचा भाग इंद्रधनुष सारका वाकडा बनतो. याने पाठिचा कणाही वाकडा होऊ शकतो. असे झाले तर हे महागात पडू शकतं. 

3) डॉ. धिकव यांचं म्हणनं आहे की, याप्रकारच्या सर्वात जास्त समस्या या विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतात. विद्यार्थी 8-8 तास पाकीट खिशात ठेवून बसलेले असतात. आमच्याकडे याप्रकारचे 20 ते 25 रुग्ण येतात. 

4) कालरा हॉस्पिटलचे डॉ. आर.एन कालरा सांगतात की, ही समस्या तरुण, वजन जास्त असलेल्या आणि जास्त वेळ बसून राहणाऱ्यांमध्ये आढळते. ही समस्या असणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. वेळेवर यावर उपचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही पाकीट मागच्या खिशात टाकून न बसण्याचा सल्ला देत असतो. 

काय घ्याल काळजी?

मागच्या खिशात पाकीट ठेवून जास्त वेळ बसू नका.हिप स्ट्रेचिंगचा व्यायाम करा.10 मिनिटांसाठी जागेवरुन उठून एकडे-तिकडे फेऱ्या मारा.बसताना पाकीट बॅगमध्ये काढून ठेवा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य