शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

नुसत्या चालण्यानं जळतील तुमच्या पाचशे कॅलरीज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:37 PM

पण रोजचं चालण्याचं आपलं टार्गेट कसं पूर्ण करणार?

ठळक मुद्देआपण किती अंतर चाललो हे सांगणारे अनेक अ‍ॅप्स सध्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतात. एमपीथ्री प्लेअर्समध्येही त्याचा उपयोग हल्ली करतात.काही शूजमध्येही अलीकडे हे तंत्रज्ञान आलेलं आहे. तुमचे शूजच सांगतील तुम्हाला, तुम्ही किती अंतर चाललात ते.

- मयूर पठाडेरोज तुम्ही किती अंतर चालता? अर्थातच तुम्ही ते मोजलं नसेल. पण ते मोजायला हवं. संशोधक सांगतात, सामान्य माणसानं दिवसभरात दहा हजार पावलं तरी चाललं पाहिजे. पण कसं मोजायचं हे? त्यासाठी पावलं मोजणं हे तसं कंटाळवाणंच. पण त्यानं तुमच्या उत्साहात आणि कार्यक्षमतेत नक्कीच फरक पडेल.समजा तुमचं वय ४५ वर्षे आहे आणि वजन ७० किलो. तुम्ही जर ताशी तीन ते पाच मैल या वेगानं चालत असाल तर दहा हजार पावलं चालल्यानंतर तुमच्या जवळपास चारशे ते पाचशे कॅलरी जळतील. पण झटपट बारीक होणं, वेट लॉस करणं हे जर तुमचं ध्येय असेल तर मात्र तुम्ही किती कॅलरी रोज खाता आणि किती बर्न करता याचा रेश्योही तपासून पाहावा लागेल आणि त्याप्रमाणात आपल्या चालण्याची तीव्रता वाढवावी लागेल.दहा हजार पावलं चालायची असं म्हटलं तर अनेकांना धसका बसेल, पण त्याची सुरुवात हळूहळूच करायला हवी. आपण किती अंतर चाललो हे सांगणारे अनेक अ‍ॅप्स सध्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतात. एमपीथ्री प्लेअर्समध्येही त्याचा उपयोग हल्ली करतात. काही शूजमध्येही अलीकडे हे तंत्रज्ञान आलेलं आहे. तुमचे शूजच सांगतील तुम्हाला, तुम्ही किती अंतर चाललात ते. त्यापेक्षा आणखी सोपा मागे म्हणजे थेट पेडोमीटरच खरेदी करायचं. त्यासाठी थोडे पैसे जातील, पण तुमचे हे पैसे वसूलही होतील. त्यातली गंमत तुम्हाला कळली की तुम्ह्ी आपोआपच आपल्या चालण्याचा लेखाजोखा ठेवायला लागाल आणि त्याप्रमाणे आपलं टार्गेट पूर्ण करायचाही प्रयत्न कराल.हे टार्गेट कसं पूर्ण करायचं, त्यासाठीच्या या आणखी काही छोट्या टीप्स..आपल्या मोबाईलमध्ये त्यासाठी रिमायंडर लावा. आपल्य मित्रांना सोबत घ्या. जे अगोदरच असं काही करताहेत त्यांच्यात जॉइन व्हा. दहा हजार पावलं आपल्याला चालायची आहेत हे डोक्यातून काढून टाका आणि निसर्गाचा आस्वाद घेत चालत राहा. तुमचं टार्गेट कधी पूर्ण होईल ते तुमचं तुम्हालाही कळणार नाही..