शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चांगल्या झोपेसाठी चालणं ठरतं अत्यंत फायदेशीर; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 16:56 IST

चालणं हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर यामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते.

चालणं हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर यामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते. नियमित चालण्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि झोप न येण्याची समस्या दूर होते, असं एका नवीन रिसर्चमधून समोर आलं आहे. संशोधकांना असं आढळून आलं की, जे लोक नियमितपणे चालतात त्यांना रात्री चांगली झोप येते आणि दिवसा जास्त ऊर्जा मिळते.

चालण्याने शरीराला आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. याशिवाय, चालण्याने शरीराच्या सर्केडियन रिदममध्ये सुधारणा होते. ज्यामुळे झोपेचं चक्र नीट होतं. तसेच चालण्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे होत असतात. 

झोपेत होते सुधारणा

- चालण्यामुळे शरीर थकते आणि रात्री चांगली झोप लागते.- चालण्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव कमी करून तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.- चालण्याने मन शांत होते आणि तुमच्या चिंता कमी होतात. यामुळे रात्री चांगली झोप येते.- नियमित चालण्याने तुमची दिनचर्या सुधारते आणि तुमच्या शरीराला ठराविक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लागते.- चालण्याने शरीराचे तापमान थोडे वाढते आणि नंतर हळूहळू कमी होते. हे शरीराला झोपेसाठी तयार करते.

'या' गोष्टींमुळेही लागू शकते चांगली झोप

व्यायाम करा

नियमित व्यायामामुळे शरीराला आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

निरोगी आहार

निरोगी आहारामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते. अभ्यासात असं आढळून आलं आहे की जे लोक निरोगी आहार घेतात त्यांना चांगली झोप येते आणि दिवसा अधिक उत्साही वाटते.

स्ट्रेस मॅनेजमेंट

स्ट्रेस मॅनेजमेंटमुळे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक स्ट्रेस मॅनेजमेंट करतात त्यांना चांगली झोप येते आणि दिवसा अधिक उत्साही वाटतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य