शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

​Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 13:20 IST

बऱ्याचजणांना जिम जाणे किंवा मॉडर्न वर्क-आउट करणे पसंत नाही. अशांसाठी शिल्पाने सांगितलेला "योगा" उत्तम पर्याय आहे.

-Ravindra Moreबदलती जीवनशैली त्यात फास्टफूड खाण्याची सवय, यामुळे बहुतांश लोकांना पोटावर चरबी येण्याची समस्या भेडसावत आहे. पोटावर चरबीची वाढ म्हणजे फक्त आपल्या व्यक्तिमत्त्वातच अडथळा नव्हे तर सोबतच अनेक व्याधींना आमंत्रणदेखील होय.पोटाची चरबी कमी करुन पोट सपाट करण्यासाठी सतत व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र¸ बऱ्याचजणांना जिम जाणे किंवा मॉडर्न वर्क-आउट करणे पसंत नाही. अशांसाठी योगा उत्तम पर्याय आहे. आज आम्ही आपणास शिल्पा शेट्टीने सांगितलेले दोन सोप्या पर्यायांविषयी माहिती देत आहोत जे आपणास पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करतील. पोटावरची चरबी करण्यासाठी पहिला सोपा पर्याय शिल्पाने आपणास सांगितला आहे तो म्हणजे पादहस्तासन. * पादहस्तासनपादहस्तासन करताना ऊर्ध्वनमस्कारात डोक्याच्या वर असणारे हात श्वास सोडत सोडत पायाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवून डोके गुडघ्यांना लावायचे असतात. यामुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होते, प्राणशक्तीचा पुरवठा होतो, स्मरणशक्ती व आकलनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. हृदय तसेच फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, सायटिका वगैरे पायांच्या नसांसंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होतो, पायांची ताकद वाढते, पोट व कंबरेच्या ठिकाणची चरबी कमी होण्यास मदत मिळते. पोट व ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांमध्ये पाळी नियमित येण्यास मदत मिळते. दुसरा पर्याय शिल्पाने सांगितला आहे तो म्हणजे सुप्त मत्स्येन्द्रासन. * सुप्त मत्स्येन्द्रासन हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी होऊन पोट सपाट होण्यास मदत होते. शिवाय पाठ आणि कंबरच्या मांसपेशींमध्ये ताण निर्माण होतो. या आसनाने पाठीचा कणा ताठ होण्यास मदत होते आणि आरामही मिळतो. तसेच पचनसंस्था सुरळीत होऊन पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात. शरीरातील विषारी पदार्थही बाहेर निघण्यास मदत होते. Also Read : ​HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !                   : ​HEALTH : ​वजन कमी करण्यासाठी पाण्याचा असा करा वापर !