वॅक्सिन लावा, पण खबरदारीही महत्त्वाची (जोड बॉक्स)

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:55+5:302015-02-14T23:51:55+5:30

-वॅक्सिनचा फायदा होतो

Use vaccine, but it is also important (attachment box) | वॅक्सिन लावा, पण खबरदारीही महत्त्वाची (जोड बॉक्स)

वॅक्सिन लावा, पण खबरदारीही महत्त्वाची (जोड बॉक्स)

-व
ॅक्सिनचा फायदा होतो
वॅक्सिन सुरक्षित आहे किंवा नाही, याबाबत काही बोलणे योग्य होणार नाही. परंतु या वॅक्सिनचा फायदा लोकांना होत आहे. काही प्रकरणात हे वॅक्सिन काम करीत नसल्याचे दिसूनही आले आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपर्यंतच या वॅक्सिनचा प्रभाव दिसून येतो. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अशोक अरबट
चेस्ट फिजिशियन

बॉक्स...
-मेडिकलमध्ये पर्याप्त उपाययोजना
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वाईन फ्लू वॉर्डात सध्याच्या स्थितीत २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे येणाऱ्या रुग्णांना तत्काळ टॅमीफ्लूचे औषध दिले जाते. यासोबतच आवश्यक उपचार केला जातो. वॅक्सिनचा खूप जास्त प्रभाव दिसून येत नसल्याची माहिती आहे.
-डॉ. अरुण हुमणे
पीएसएम विभाग, मेडिकल
-----
स्वाईन फ्लूची आकडेवारी
वर्ष रुग्णमृत्यू
२०१२५०४४४०५
२०१३५२५३६९९
२०१४२१४८२४९
२०१५५५००४८५
नोट : ही आकडेवारी देशभरातील आहेत. वर्षे २०१५ मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील आकडे आहेत.


::लक्षणे
- थंडी वाजून ताप येणे
-खोकला व घसा खरखरणे
-अंगपाय दुखणे, सर्दी आणि शिंका येणे
-डोकेदुखी, सुस्त वाटणे, थकवा येणे
- भीती वाटणे, उल्टी होणे.

::उपाययोजना
-१५ ते २० सेकंदापर्यंत साबणाने हात धुवावे
-अल्कोहलयुक्त हॅण्डवॉशने हात धुवावे
-संक्रमित रुग्णाच्या चेहऱ्यावर मास्क लावावेत.
-सार्वजनिक स्थळांपासून दूर रहावे.
-इतरांकडून होणाऱ्या डोळे, नाक, तोंडाच्या स्पर्शापासून स्वत:ला वाचवावे
-ताप, खोकला असल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासावे.

Web Title: Use vaccine, but it is also important (attachment box)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.