शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 'या' फळाच्या रसाचा करा असा वापर, आहे खुपच फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 17:57 IST

किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. रोज एक पेय पिऊन तुम्ही तुमचा हा महत्त्वाचा अवयव स्वच्छ करू शकता आणि किडनीला होणारे नुकसान टाळू शकता. जाणून घेऊया किडनी क्लींजिंग ड्रिंक कधी आणि कसे (Lemon Drinks for Kidney) प्यावे.

आपल्या शरीरात किडनीचं कार्य खूप महत्त्वपूर्ण आहे. मूत्रपिंडाचे प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे रक्त स्वच्छ करणं आणि त्यातील नको असलेले विषारी घटक दूर करणं. शिवाय रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत करते. रेनिन नावाच्या संप्रेरकाद्वारे किडनी रक्तदाब कमी किंवा वाढवू शकते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. रोज एक पेय पिऊन तुम्ही तुमचा हा महत्त्वाचा अवयव स्वच्छ करू शकता आणि किडनीला होणारे नुकसान टाळू शकता. जाणून घेऊया किडनी क्लींजिंग ड्रिंक कधी आणि कसे (Lemon Drinks for Kidney) प्यावे.

शरीरात किडनीचे महत्त्व काय?झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, मूत्रपिंड शरीरातील घाण आणि शरीरातील द्रवपदार्थ लघवीद्वारे बाहेर काढते. याशिवाय किडनी मानवी शरीरातील मीठ, पोटॅशियम आणि ऍसिडचे प्रमाण नियंत्रित करते. यासोबतच काही हार्मोन्स देखील किडनीमधून बाहेर पडतात जे आपल्या शरीराच्या इतर अवयवांना कार्य करण्यासाठी आवश्यक असतात.

लिंबू किडनीसाठी फायदेशीर आहे -हार्वर्डच्या अहवालानुसार, दररोज 2 लिंबांचा रस प्यायल्याने मूत्रमार्गात सायट्रेट वाढते आणि किडनीतील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्याच वेळी, जे लोक दररोज २ ते २.५ लिटर लघवी करतात, त्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी असते. किडनीला हेल्दी ठेवणाऱ्या ड्रिंक तुम्ही सकाळी आणि दुपारी पिऊ शकता.

मूत्रपिंडांसाठी लिंबू पेय

  1. पुदीना आणि लिंबूएक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि थोडी साखर घालून चांगले मिसळा आणि प्या. किडनीसाठी हे हेल्दी ड्रिंक आहे.
  2. मसाला लिंबू सोडाएक ग्लासमध्ये लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला आणि सोडा चांगला मिसळा. मसाला लिंबू सोडा तयार होईल, जो आपल्या किडनीसाठी हेल्दी ड्रिंक आहे.
  3. नारळ शिकंजीहेल्दी किडनी ड्रिंक बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये नारळ पाणी घ्या आणि या पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या पद्धतीनं घेतल्यास त्याचा किडनीसाठी फायदा होतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स