शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा हे 6 नैसर्गिक उपाय, दिवसभर दरवळेल सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:21 IST

Bad body odor : घाम आल्यावर शरीरावरील कीटाणूंसाठी तो प्रजनानाचं काम करतो. घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मेडिकल उपचाराची गरज नसते. तुम्ही काही नैसर्गिक उपाय करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता. 

Bad body odor : असे अनेक लोक आहेत जे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतात. पण तरीही त्यांच्या शरीरातून एक अजब प्रकारची दुर्गंधी येते. अर्थातच या समस्येमुळे चार चौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. ही समस्या कोणत्याही वयातील व्यक्तींना होते. ही दुर्गंधी हलकी किंवा तीव्र असते.ही एक सामान्य समस्या आहे. असं मानलं जातं की, शरीराची दुर्गंधी केवळ तुमच्या शरीरातून येणारी एक अप्रिय दुर्गंधी आहे आणि ही घामामुळे येते. घाम येणं एक शारीरिक क्रिया आहे. पण हेही सत्य आहे की, घामाला गंध नसतो. पण घाम आल्यावर शरीरावरील कीटाणूंसाठी तो प्रजनानाचं काम करतो. घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मेडिकल उपचाराची गरज नसते. तुम्ही काही नैसर्गिक उपाय करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता. 

अॅपल विनेगर

एक कॉटन पॅड घ्या आणि त्यावर थोडं अ‍ॅपल विनेगर टाकून घाम येतो त्या भागांवर लावा. विनेगर त्वचेची पीएच लेव्हल संतुलित करण्यास मदत करतं आणि दुर्गंधी निर्माण करणाऱ्या सर्व बॅक्येरियांना मारतं.

​टी ट्री ऑयल

2 चमचे टी ट्री ऑइल आणि 2 चमचे पाणी घ्या. टी ट्री ऑइलमध्ये पाणी मिक्स करा. हे पाणी थेट आपल्या अंडरआर्म्स आणि इतर भागांवर लावा. टी ट्री ऑइल एक नैसर्गिक अ‍ॅंटीसेप्टीक आहे. ज्याने तुमच्या शरीराची दुर्गंधी सहजपणे दूर होईल.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा तुम्ही टॅल्कम पावडरच्या रूपात वापर करू शकता. बेकिंग सोडा एक पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी, काखेत, पायांच्या बोटांच्या मधे लावा. यासाठी एक कप पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाका. कपडे घालण्याआधी हे मिश्रण घाम येणाऱ्या भागांवर लावा.

​ग्रीन टी

पाणी उकडून घ्या आणि त्यात ग्रीन टी ची काही पाने टाका. हे पाणी थंड झालं तर कॉटनच्या मदतीने ते घाम येणाऱ्या भागात लावा. चहा त्वचा शुष्क आणि गंधमुक्त ठेवण्यास मदत करते. याचा वापर तुम्ही आठवड्यातून दोनदा करा.

टोमॅटोच्या पाण्याने आंघोळ

1 कप ताजा टोमॅटोचा रस घ्या आणि तो एक बकेट पाण्यात टाका. या पाण्याने आंघोळ करा. टोमॅटोमधील अ‍ॅंटीसेप्टीक गुण कोणत्याही प्रकारचा गंध निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यास मदत करतो.

लिंबू आणि कॉर्नस्टार्च

लिंबू त्वचेची पीएच लेव्हर संतुलित करण्यास मदत करतं. 2 मोठे चमचे कॉर्नस्टार्च आणि लिंबाचा रस घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा आणि 10 मिनिटांनी ती स्वच्छ करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य