साबण, टुथपेस्ट, हॅंड सॅनिटायजर्स, प्रदूषित पाणी आणि माउथवॉशसारख्या वस्तू रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत. या वस्तुंकडे फार सुरक्षित असल्याच्या दृष्टीने पाहिलं जातं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, या वस्तुंच्या वापराने आरोग्याला धोकाही असू शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, महिलांना या वस्तुंच्या वापराने ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढतो.
Telegraph वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, महिलांना या वस्तुंपासून ज्या ऑस्टिओपोरोसिस आजाराचा धोका आहे, त्याचं कारण या वस्तुंमधील ट्रायक्लोसॅन आहे. तसा महिलांना कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो, पण रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या महिला अॅंटी-बॅक्टेरिअल साबण, टूथपेस्ट किंवा पर्सनल केअर प्रॉडक्टचा वापर करतात, त्यांना या आजाराचा धोका अधिक असतो.
चीनच्या एका मेडिकल कॉलेजमधील यिनजुंग ली सांगतात की, लेबॉरेटरीतील अभ्यासातून हे समोर आलं की, ट्रायक्लोसॅन ने प्राण्यांच्या बोन मिनरल डेंसिटीवर फार खराब प्रभाव पडतो. पण ट्रायक्लोसॅन आणि मनुष्यांच्या हाडांमध्ये काय संबंध आहे. हे कमीच माहिती पडलं आहे. हे समोर आलं की, ज्या महिलांच्या यूरिनमध्ये ट्रायक्लोसॅनचं प्रमाण अधिक असतं, त्यांच्यात हाडांशी संबंधित समस्या अधिक बघायला मिळतात.
काही रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, ट्रायक्लोसॅन थायरॉइड आणि रिप्रॉडक्टिव सिस्टीमला सुद्धा प्रभावित करतो. पण ट्रायक्लोसॅन ऑस्टोयोपोरोसिससाठी थेट जबाबदार असतं. हे सिद्ध करण्यासाठी आणखी काही रिसर्चची गरज आहे. पण योग्य काळजी घेतली गेली तर यापासून बचाव केला जाऊ शकतो. प्रॉडक्ट खरेदी करताना लेबल्स जरूर वाचावे आणि प्रयत्न करा की, ट्रायक्लोसॅन असलेले साबण, टूथपेस्ट आणि माउथवॉश वापरू नये.