जोड-बाटलीच्या छोट्याशा झाकणात चक्क १०० डासांची उत्पत्ती

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:07+5:302016-03-03T01:57:07+5:30

ही घ्या काळजी

A total of 100 mosquitoes in a pair of bottle of small lenses | जोड-बाटलीच्या छोट्याशा झाकणात चक्क १०० डासांची उत्पत्ती

जोड-बाटलीच्या छोट्याशा झाकणात चक्क १०० डासांची उत्पत्ती

घ्या काळजी
पाणीटंचाईमुळे पाणीसाठा करण्यावर नागरिकांकडून भर दिला जातो; परंतु अशी भांडी पूर्ण झाकून ठेवण्याची गरज आहे. कोणत्याही दुर्लक्षित ठिकाणी, भांड्यात अधिक दिवस पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, रिकामे न करता येणारे हौद, पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडावे, अळीनाशक औषधी टाकावे, दर आठवड्यास पाण्याची भांडी रिकामी करून कोरडी करावी, घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे केले जात आहे.
चिकुन गुनिया सुरूच
चिकुन गुनियावर नियंत्रण येत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. दर महिन्याला २ ते ३ रुग्ण आढळून येत आहेत; परंतु प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ही आकडेवारी अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: A total of 100 mosquitoes in a pair of bottle of small lenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.