उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:58+5:302015-02-21T00:49:58+5:30
उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
उ ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीमदोन लाखांवर बालकांना देणार डोज नागपूर : येत्या २२ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पाच वर्षांखालील २ लाख १४ हजार ९२२ लाभार्थ्यांना पल्स पोलिओचा डोज देण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी शुक्रवारी आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या सभेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाय. आर. सवई, माध्यमिक शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे, उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, मनोहर बावने आदी उपस्थित होते. या मोहिमेसाठी २३४६ लसीकरण केंद्र, ३७६ ट्रान्झीस्ट चमू, २१० मोबाईल चमू ग्रामीण भागात राहणार असून शहरी भागात २०४ लसीकरण केंद्र तसेच १९० ट्रान्झिस्ट चमू राहणार आहे. एकही बाल पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महामार्गावर रस्त्याच्या बाजुला वास्तव्यास असलेली घरे, शेतातील लाभार्थी पूल व इमारतीच्या बांधकामावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराचे दिवशी येणारी बालके यांना मोबाईल चमूद्वारे पोलिओ लस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व बस स्टॅण्ड व इतर जनतेची वर्दळ असलेल्या ठिकाणी ट्रान्झिस्ट बुथद्वारे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.