शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या Mental Well Being च्या बाबतीत टिअर 2 शहरे तुलनेने आघाडीवर : रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 20:10 IST

World Mental Health Day 2021: संशोधनात भारतातील शहरी भागातील नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगचा वेध घेण्यात आला आणि त्यासाठी जुलै व सप्टेंबर 2021 या कालावधीत 16 शहरांतील 1003 जणांना सहभागी करून घेण्यात आले.

नवी दिल्ली :  जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने (World Mental Health Day) टीआरए रिसर्च या कंझ्युमर इन्साइट व ब्रँड अनालिटिक्स कंपनीने दुसरा मेंटल वेल बीइंग (Mental Well Being) अहवाल सादर केला आहे. या अहवालातील संशोधनात भारतातील शहरी भागातील नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगचा वेध घेण्यात आला आणि त्यासाठी जुलै व सप्टेंबर 2021 या कालावधीत 16 शहरांतील 1003 जणांना सहभागी करून घेण्यात आले. या अभ्यासामध्ये नागरिकांची आरोग्यविषयक चिंता, अर्थव्यवस्थाविषयक चिंता, कौटुंबीक चिंता व आर्थिक चिंता आणि त्यांचा सामना करण्याची नागरिकांची क्षमता यांचीही पाहणी करण्यात आली. 

टिअर 2 शहरांनी उत्तम मेंटल वेलबीइंग गुण नोंदवले आहेत. कोचीने MWBI 2021 मध्ये सर्वाधिक, म्हणजे +177% (MWBI 2020 च्या तुलनेत 131% अधिक) गुण नोंदवले आहेत. लखनऊचे गुण +147%, आणि चंडीगडचे +144% MWBI असून, त्यांच्या गुणांमध्ये फारच कमी फरक आहे आणि त्यामध्ये अगोदरच्या वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत अंदाजे 300% वाढ झाली आहे. याबरोबरच, इंदूर (+113% MWBI) आणि जयपूर (+101% MWBI) यांनी अतिशय चांगले मेंटल वेलबीइंग गुण नोंदवले असून, आघाडीच्या तीन शहरांमध्ये समाविष्ट होण्याबाबत ही शहरे आशादायी आहेत. 

मानसिक आरोग्याबाबत सर्वात वाईट गुण कोलकाता (+9% MWBI), अहमदाबाद (+3% MWBI) आणि चेन्नई (-8% MWBI) या शहरांनी नोंदवले आहेत. या तिन्ही शहरांनी मानसिक आरोग्याच्या बाबत संतुलन दाखवले आहे, परंतु चेन्नईला  मिळालेले नकारात्मक गुण चेन्नईतील रहिवाशांची त्यांच्या चिंता हाताळण्याची असमर्थता दाखवतात. 

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने टीआरएचा कोरोना व्हायरस मेंटल वेलबीइंग इम्पॅक्ट अहवाल सादर करताना, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. चंद्रमौली यांनी म्हटले की, "गेल्या वर्षी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये, भारताभरातील लोकांमध्ये सर्वाधिक चिंता ‘आर्थिक चिंता’ होती व तिचे प्रमाण 60% होते. MWBI 2021 मध्ये ही चिंता 47% पर्यंत कमी झाली आहे. ‘कौटुंबिक चिंता’ समान राहिली असून या वर्षी फक्त 1% म्हणजे 53% पर्यंत कमी झाली आहे, तर ‘आरोग्यविषयक चिंता’ 49% MWBI आणि ‘अर्थव्यवस्थाविषयक चिंता’  36% आहे आणि हे प्रमाण समान राहिले असून गेल्या वर्षीपेक्षा केवळ 1% घटले आहे.”

याचबरोबर, महासाथीमुळे अधिकाऱ्यांना किंवा कंपन्यांना मानसिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता आलेले नाही. मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम ही दीर्घकालीन समस्या आहे आणि याचा परिणाम व्यक्ती, कॉर्पोरेट व प्रशासन यांच्याशी असलेल्या नात्यामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो, असे ए. चंद्रमौली यांनी स्पष्ट केले. 

नजीकच्या काळामध्ये कोणते उपक्रम करायला आवडतील, असा प्रश्नही संशोधनामध्ये लोकांना विचारण्यात आला. यावर मिळालेली उत्तरे आश्चर्यजनिक नव्हती. जवळडवळ 38% जणांनी उत्तर दिले की त्यांना मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत गेट टुगेदर करायचे आहे. अनेक ठिकाणे आता लोकांसाठी खुली होऊ लागली असली तरी सुटीवर जाणे किंवा अगदी धार्मिक स्थळी जाणे ही उपक्रम ‘राबवण्याची शक्यता/अधिक शक्यता’ आहे, असे केवळ 28% जणांनी सांगितल्याचे ए. चंद्रमौली यांनी म्हटले आहे.

याशिवाय, निवांतपणासाठी प्रवास करण्याची इच्छा 25% जणांनी व्यक्त केली, तर सहभागी झालेल्या 21% जणांना खरेदीसाठी मॉलमध्ये जायची इच्छा आहे. चित्रपटगृहांना आणखी काही काळ प्रेक्षकांची वाट बघावी लागण्याची शक्यता आहे, कारण केवळ 8% जणांनी हा उपक्रम नजिकच्या काळात ‘राबवण्याची शक्यता/अधिक शक्यता’असल्याचे सांगितले आहे, असे ए. चंद्रमौली यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य