शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

मंकीपॉक्स पासून वाचण्यासाठी अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, साधे सोपे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 17:38 IST

मंकीपॉक्स हा धोकादायक आजार असला, तरी आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास मंकीपॉक्सचे रुग्ण वेगाने बरे होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या गोष्टी कोणत्या आहेत त्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसतानाच, जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) या आजाराने थैमान घातलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा आजार जागतिक आरोग्य आणीबाणी (Health Emergency) म्हणून घोषित केला आहे. भारतातदेखील मंकीपॉक्सचे (Monkeypox in India) आतापर्यंत चार रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंकीपॉक्स हा धोकादायक आजार असला, तरी आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास मंकीपॉक्सचे रुग्ण वेगाने बरे होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या गोष्टी कोणत्या आहेत त्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मंकीपॉक्सच्या लक्षणांपैकी सर्वांत महत्त्वाचं लक्षण (Monkeypox symptoms) म्हणजे, शरीरावर चिकनपॉक्सप्रमाणे फोड दिसून येणं. मंकीपॉक्स झाल्यानंतर वेगाने बरं होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुमची इम्युनिटी बूस्ट (Immunity Booster food) करण्यासाठी काही पदार्थांचा समावेश आहारात करणं आवश्यक आहे. यामध्ये तुळशीची पानं, पुदिना आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ यांचा समावेश होतो.

तुळशीची पानंतुळशीच्या पानांचं महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. एक औषधी वनस्पती म्हणूनही तुळशीकडे पाहिलं जातं. तुळशीची पानं (Tulsi leaves) पाण्यामध्ये टाकून ठेवावी, आणि काही काळानंतर हे पाणी रुग्णाला प्यायला द्यावं; यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. ज्या लोकांना मंकीपॉक्सची लागण झालेली नाही, अशा व्यक्तींनीही दररोज हा काढा (Tulsi charged water) प्यायला हवा. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.

पुदिनातुळशीसोबतच पुदिनादेखील आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. एरव्ही एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्यात पुदिन्याचा (Mint Leaves health benefits) वापर केला जातो, मात्र याचे औषधी गुणधर्मही आहेत. विशेषतः पोटदुखीवर पुदिन्यामुळे भरपूर आराम मिळतो. पुदिनायुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे मांसपेशींवर आलेला ताण दूर होतो. सोबतच, दम्यासारख्या गंभीर आजारावरही पुदिना गुणकारी समजला जातो. पुदिनायुक्त हर्बल टी प्यायल्यामुळे खोकल्याची समस्यादेखील दूर होते.

व्हिटॅमिन सीकोरोना काळातदेखील ‘व्हिटॅमिन सी’चं महत्त्व तुम्ही ऐकलंच असेल. खरं तर हे व्हिटॅमिन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. इम्युन सिस्टीम (Immune system) चांगली असल्यास कित्येक आजार तुमच्यापासून दूर राहतात. या आजारांमध्येच मंकीपॉक्सचाही समावेश आहे. अर्थात, याबाबत अद्याप कोणताही पुरावा समोर आला नाही. तुम्हाला लिंबू, संत्री अशा आंबट पदार्थांमधून व्हिटॅमिन सी (Vitamin C sources) मिळू शकतं किंवा जर तुम्हाला आंबट पदार्थ आवडत नसतील, तर पपई या फळातूनही तुम्हाला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळू शकेल.

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण दिल्लीमध्ये आणि तीन रुग्ण केरळमध्ये आहेत. इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत असताना, भारतात ती स्थिती येऊ नये यासाठी आपल्यालाच खबरदारी बाळगावी लागणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स