शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

थायरॉइडचा त्रास जाणवतो; मग 'ही' सात योगासनं ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 22:01 IST

योग साधना संपूर्ण आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते. आपल्या शरीराची लवचिकता वाढवते.

- डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र योग साधना संपूर्ण आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते. आपल्या शरीराची लवचिकता वाढवते. ऊर्जा संतुलित राखून तणाव कमी करण्यास मदत करते. थायरॉईड आणि तणाव यांच्यात संबंध आहे. कमी किंवा जास्त प्रमाणात असलेला थायरॉइडमध्ये शरीराचे संतुलन राखण्यास योग सहाय्यता करू शकतो. कित्येक आसन अशी आहेत ज्याने तुमचा थायरॉइड नियंत्रणात आणू शकतो. थायरॉइडसाठी जी आसनं आहेत ती साधारणतः घशाला फायदेशीर ठरतात. त्या आसनामुळे घशातील ग्रंथीमधील ऊर्जा व रक्तप्रवाह सुधारतो आणि मानेचे स्नायू बळकट होतात. या लेखात काही आसनं दिलेली आहेत, जी आपल्याला थायरॉईड बरा होण्यास मदत करू शकतात.सर्वांगासन:- (खांदा स्टँड) आपल्याला थायरॉक्सिन नियंत्रित करण्यासाठी आणि थायरॉइड ग्रंथींना पुनर्जीवित (active)  करण्यासाठी मदत करतात. या आसनांमध्ये डोकं खाली व दोन्ही पाय उलट्या दिशेला वर केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह डोक्यापर्यंत जातो.भुजंगासन :- हा अतिशय सोपा आसन प्रकार आहे. घसा आणि मान या दोन्ही भागांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीचे कार्य वाढते. हे मान आणि मणक्याचे दुखणेसुद्धा कमी करते. या आसनामुळे मानेचे स्नायू बळकट होतात.मत्स्यासन :- या आसनामुळे सांधे आणि स्नायू कडक होत नाहीत. त्यामुळे ताणतणाव कमी होतो. हे आसन शारीरिकदृष्ट्या आरामदायी ठरते. या आसनामुळे मूड स्विंग आणि नैराश्य यांना प्रतिबंध घातला जातो. जी थायरॉइडची लक्षण आहेत. 

सेतुबंधासन :- (ब्रीज पोझ) हे आसन मानेच्या स्नायूवर काम करते. ज्यामुळे स्नायू पूर्णपणे ताणले जातात. या आसनामुळे मेंदूला शांत करणे, चिंता कमी करणे आणि पचनक्रिया सुधारण्यास फायदा होतो.प्राणायम :- उज्जय्यी, भ्रामरी, नाडी शोधन हे सगळे प्राणायम मानेच्या स्नायूंवर कार्य करतात, थायरॉइडच्या लक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सगळे प्राणायम प्रभावी आहेत.ध्यान :- जप किंवा मंत्रासह ध्यान केल्यास थायरॉइडवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. दररोज काही मिनिटे ध्यान केल्यास मन शांत आणि तणावाची पातळी कमी होण्यास मदत होते.शवासन :- शवासन हायपर किंवा हायपोथायरॉईड या दोन्ही प्रकारासाठी काम करते. हे आपल्याला शांत करते  आणि तणावाची पातळी देखील खाली आणते. चांगली झोप :- योग्य व पुरेशी झोप मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर नैसर्गिकरीत्या मेलाटोनिम सोडते. झोपेच्या वेळी पायनल ग्रंथी देखील आपले कार्य करत असतात. ज्यामुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत होते. म्हणूनच रात्री १० वाजता झोपले पाहिजे. त्यामुळे झोपेचे एक व्यवस्थित चक्र पूर्ण होईल. सक्षम आणि निष्णात अशा योग शिक्षकेकडूनच योगासने शिकवीत. योगाचा आपल्या शरीरावर, मनावर आणि श्वासावर चमत्कारिक व चांगला परिणाम होऊ शकतो. परंतु दररोज व पूर्णपणे जागरूकतेने योगाचा सराव केला तरच असे होऊ शकते. आपण आपली थायरॉईडची औषधे घेणे थांबावू नये. औषधासोबतच योगाचा सराव चालू ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे कमी किंवा बंद करावीत. योग सुखी जीवनाचा एक सोपा मार्ग आहे. दररोज सुरक्षितपणे याचा सराव करा. योग आपल्याला थायरॉईडचा सामना चांगल्या आणि कार्यक्षम पद्धतीने करण्यास नक्कीच मदत करेल.

(लेखिका द योग इन्स्टिट्युटच्या संचालिका आहेत.)

टॅग्स :Yogaयोग