Corona Vaccine : वय १८ वर्षे पूर्ण असलं तरी या लोकांनी घेऊन नये कोरोना वॅक्सीन, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 01:48 PM2021-04-29T13:48:04+5:302021-04-29T13:51:51+5:30

Corona Vaccine : वॅक्सीनबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आणि भीती आहे. याचं कारण म्हणजे काही लोकांमद्ये वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स दिसले आहेत.

These specific people should not get corona vaccine may get side effects on health | Corona Vaccine : वय १८ वर्षे पूर्ण असलं तरी या लोकांनी घेऊन नये कोरोना वॅक्सीन, जाणून घ्या कारण!

Corona Vaccine : वय १८ वर्षे पूर्ण असलं तरी या लोकांनी घेऊन नये कोरोना वॅक्सीन, जाणून घ्या कारण!

googlenewsNext

कोरोना व्हायरस (Coronavirus) वाढत्या केसेसमुळे भारत सरकारने लसीकरणाची मोहिम (Coronavaccine) अधिक वेगवान केली आहे. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना वॅक्सीन दिली जाणार आहे. वॅक्सीनबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आणि भीती आहे. याचं कारण म्हणजे काही लोकांमद्ये वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स दिसले आहेत. इतकंच काय तर काही लोकांची जीवही गेला आहे. अशात आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, वॅक्सीन कुणी घेऊ नये.

वॅक्सीन डोज इंटरचेंज करू नका

सध्या देशात दोन वॅक्सीनचा वापर होत आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड. आरोग्य मंत्रालयाकडून काही आवश्यक गाइडलाइन्स जारी करून हे सांगण्यात आलं आहे की, कोणत्या लोकांनी या वॅक्सीन घेऊ नये. सोबत आरोग्य मंत्रालयाने हे सांगितलं आहे की, वॅक्सीनचा डोज इंटरचेंज करता येणार नाही. म्हणजे पहिल्या आणि दुसरा डोज एकाच वॅक्सीनचा असला पाहिजे. (हे पण वाचा : CoronaVirus : लक्षणं असतानाही या ५ कारणांमुळे तुमची कोरोनाची टेस्ट येऊ शकते निगेटिव्ह; वेळीच सावध व्हा)

कुणी घेऊ नये वॅक्सीन?

१) १८ पेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीने दोनपैकी कोणतीही वॅक्सीन घेऊ नये. कारण त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांवर यांची ट्रायल घेण्यात आलेली नाही.

२) गर्भवती महिला आणि बाळांना ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनी सुद्धा कोरोनाची वॅक्सीन घेऊ नये. कारण गर्भवती आणि ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांवर या वॅक्सीनची ट्रायल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या महिलांवर वॅक्सीनचा काय प्रभाव होईल हे स्पष्ट नाही. (हे पण वाचा : बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स)

३) जर ट्रायलमध्ये सहभागी कोणत्याही व्यक्तीला कोविड-१९ वॅक्सीनमुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी झाली असेल किंवा जर पहिला डोज घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये एलर्जिक रिअॅक्शन दिसले तर अशा लोकांनी वॅक्सीन घेऊ नये.

४) ज्या लोकांमध्ये कोविड-१९ ची सक्रिय लक्षणे दिसत आहेत, त्यांना संक्रमणातून पूर्णपणे बाहेर आल्यावर ४ ते ८ आठवड्यानंतर वॅक्सीन घ्यावी. 

५) जर एखाद्या व्यक्तीला ताप, ब्लीडिंग डिसऑर्डर म्हणजे रक्तासंबंधी काही आजार किंवा एखाद्या रूग्णांला रक्त पातळ करण्याचं औषध सुरू असेल तर त्यांनी कोरोना वॅक्सीन घेऊ नये.

६) कोरोना व्हायरसने पीडित ज्या रूग्णांचा उपचार प्लाज्मा थेरपी किंवा अॅंटीबॉडीच्या मदतीने केला जात असेल, अशा रूग्णांनाही रिकव्हर होण्यासाठी ४ ते ८ आठवड्यानंतरच वॅक्सीन घेतली पाहिजे. त्याआधी त्यांनी वॅक्सीन घेऊ नये.
 

Web Title: These specific people should not get corona vaccine may get side effects on health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.