शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसच्या रुग्णांनी स्पर्शही करु नका 'या' फळांना, सेवन केल्यास साखर प्रचंड वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:58 IST

अशी कोणती फळे आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते, त्याविषयी आज आपण जाणून (Harmful Fruits for Diabetic) घेऊया.

फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. फळांच्या सेवनाने शरीरातील अनेक खनिजे, फायबर, जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण होते. फळे खाल्ल्याने आपली पचनक्रियाही मजबूत राहते. निरोगी आहारासाठी, फळे देखील पुरेशा प्रमाणात खाणे आवश्यक आहे. मात्र, काही फळे मधुमेह असणाऱ्यांनी खायची नसतात, त्यांना फळांचा देखील त्रास होऊ शकतो. अशी कोणती फळे आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते, त्याविषयी आज आपण जाणून (Harmful Fruits for Diabetic) घेऊया.

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खाणे टाळावीत -MedicalNewsToday च्या माहितीनुसार ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स 70 ते 100 च्या दरम्यान असतो, त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते, जसे की टरबूज, केळी, पण शुगर असलेले लोकदेखील ही फळे खाऊ शकतात. मात्र, त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. कोणते फळ खाता, तुम्ही किती प्रमाणात फळ खात आहात हे जास्त महत्त्वाचे आहे.

अननस -अननसात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांना अननसाचा ज्युस पिण्यास मनाई आहे. एक कप अननसाच्या रसामध्ये 14 ग्रॅम साखर असते, त्यामुळे ते टाळले पाहिजे. फार थोड्या प्रमाणात अननस खाऊ शकता, ज्युस नकोच.

आंबा टाळा -साखरेच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई आहे किंवा खाणे टाळण्यास सांगितले जाते. मधुमेहाच्या रुग्णाने आंब्याचे सेवन करू नये, कारण एक कप आंब्यामध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते, त्यामुळे हे फळ मधुमेहींसाठी त्रासदायक ठरू शकते.

चेरी नकोत -चेरी खायला अनेकांना आवडतात, म्हणून ती आईस्क्रीम आणि केकमध्ये जास्त वापरली जातात. पण, अनेकांना माहीत नाही की, एक कप चेरीमध्ये सुमारे 20 ग्रॅम साखर असते. त्यामुळे साखर असलेल्या रुग्णांनी-मधुमेही रुग्णांनी चेरी खाणे टाळावे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स