शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वजनामागे 'ही' कारणे देखील असू शकतात, त्यासाठी लगेच करून घ्या 'या' टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 13:49 IST

वजन वाढणे हे फक्त आहार आणि व्यायाम यावरच अवलंबून नसते. त्या मागे इतर कारणही असू शकतात. त्यासाठी तुम्ही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.

वजन वाढल्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. यामुळे आवडीचे कपडे परिधान करण्यामध्येही अडचणी निर्माण होतात. शिवाय आत्मविश्वासावरही परिणाम होऊ लागतो. वजन घटवण्यासाठी काही जण वर्कआउटपासून ते डाएटिंग इत्यादी कित्येक प्रकारचे उपाय करून पाहतात. पण इतके प्रयत्न करूनही काही जणांचे वजन कमी (Weight Loss) होत नाही. त्यामुळे वजन वाढणे हे फक्त आहार आणि व्यायाम यावरच अवलंबून नसते. त्या मागे इतर कारणही असू शकतात. त्यासाठी तुम्ही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.

पीसीओएस पीसीओएस (PCOS) होण्याचे मुख्य आणि एकमेव कारण आहे हार्मोन (hormone) म्हणजे संप्रेरक शरीरात अनियमित तयार होणे. आजकाल पीसीओएस (PCOS) फार प्रमाणात आढळतो. याचं मुख्य कारण बदलती जीवनशैली! हे महिलांमध्ये वजन वाढण्याचं प्रमुख कारण असतं. अनियमित संप्रेरक अंडकोषात अंडी तयार होऊ देत नाहीत. जर झालीच तर अंडकोषातून बाहेर पडायला मज्जाव करतात. तयार झालेले अंड अंडकोषातच राहातं. तसंच पाण्याचा बुडबुडा अंडकोषात तयार होतो. प्रत्येक महिन्यात ही प्रक्रिया होते आणि अंडकोषात अनेक पाण्याच्या गाठी (cyst) तयार होतात. पीसीओएस (PCOS)ची तपासणी, चाचणी आणि उपाय योग्य वेळेत होणं फार आवश्यक आहे. जर उशीर झाला तर अंडाशय कायमचं निकामी होऊ शकतं.

थायरॉइड टेस्टथायरॉइड हॉर्मोन्सचे रक्तातील स्राव कमी झाल्यावर हा विकार उद्भवतो. याचं वजन वाढणे हे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय थकवा येणे, केस गळणे आदीही लक्षणे या विकारात आढळून येतात. हा विकार शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटींग हॉर्मोन अर्थात टीएसएच तपासणी. हॉर्मोन थेरपी देऊन या विकारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

ब्लड शुगर टेस्टब्लड शुगर टेस्ट ही अशी प्रक्रिया आहे जी आपल्या रक्तातील साखर किंवा ग्लुकोजचे प्रमाण मोजते. मधुमेहाचे निदान करण्यासाठी ही चाचणी केली जाते. मधुमेह हे वजन वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मधूमेह आहे का नाही हे ओळखण्यासाठी ही टेस्ट काहीही न खाता-पिता 12 तासांनंतर केली जाते. रक्तातील साखरेचं प्रमाण 99 पेक्षा कमी असेल तर सामान्य मानलं जातं.

लिपिड प्रोफाईल टेस्टकॉलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि तुमचे वजन याचा थेट संबध असतो. त्यासाठी लिपिड प्रोफाईल टेस्ट करून घ्या. ही एक रक्त तपासणीसारखीच चाचणी असते. ही चाचणी तुमच्या हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या रोगाशी निगडित आहे. ही चाचणी रक्ताची चाचणी, टोटल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एचडीएल आणि एलडीएलची पातळी मोजण्यासाठी केली जाते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयरोग किंवा मधुमेह असेल, तर त्या व्यक्तीने वर्षातून एकदा ही चाचणी करायला हवी.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स