शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दुर्मीळ रक्तविकारांवरील उपचारात बोन मॅरो ट्रान्स्प्लांटचे युग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:09 IST

Bone Marrow Transplant : बोन मॅरो अत्यावश्यक असलेल्या रक्तपेशी निर्माण करते. जेव्हा हे कार्य थांबते, तेव्हा आरोग्यदायी बोन मॅरोची पुनर्स्थापना करणे आवश्यक ठरते. यासाठीच बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा वापर केला जातो.

(डॉ. प्रियतेश द्विवेदी, हेमेटो-ऑन्कोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एचसीजी कॅन्सर सेंटर, नाशिक)

Bone Marrow Transplant : हृदय आणि मेंदू हे मानवी शरीरातील सर्वांत महत्त्वाचे अवयव मानले जातात. तथापि, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वांत शक्तिशाली उपचार प्रणालींपैकी एक आपल्या हाडांच्या आत दडलेली आहे, अस्थिमज् अर्थात बोन मॅरो. ही स्पंजाप्रमाणे असणारी ऊती शरीराला आवश्यक असणाऱ्या रक्तपेशी तयार करण्याचे काम करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती, ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे काम सुरळीत चालते. मात्र, जेव्हा बोन मॅरोचे कार्य बाधित होते, तेव्हा दुर्मीळ रक्तविकार प्राणघातक ठरू शकतो. अशा वेळी ‘बोन मॅरो ट्रान्स्प्लांट’ आशेचा किरण बनतो.

दुर्लभ रक्तविकार म्हणजे काय?

दुर्लभ रक्तविकार म्हणजे असे विकार जे रक्तपेशी (लाल, पांढऱ्या वा प्लेटलेट्स) तयार होण्यात अडथळा आणतात किंवा त्यांच्या गुणवत्तेत दोष निर्माण करतात. यामध्ये एप्लास्टिक अ‍ॅनिमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल डिसीज, प्राथमिक इम्युनोडिफिशियन्सी डिसऑर्डर्स व काही दुर्मीळ रक्ताचा कर्करोग यांचा समावेश होतो. हे विकार प्रामुख्याने अनुवंशिक असतात किंवा लहानपणीच दिसून येतात. काही वेळा संसर्ग, पर्यावरणीय घटक किंवा जनुकीय बदलांमुळे नंतरही होऊ शकतात.दुर्लभ हे विशेषण या विकारांसाठी त्यामुळेच वापरले जातात. कारण ते उपचारासाठी खूप अवघड असतात. या विकारांसाठी वारंवार हॉस्पिटलला भेट देणे, आयुष्यभर औषधे आणि सतत देखरेख आवश्यक असते. हा प्रकार अनेक कुटुंबांसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक ठरतो.

बोन मॅरोचे महत्त्व

बोन मॅरो अत्यावश्यक असलेल्या रक्तपेशी निर्माण करते. जेव्हा हे कार्य थांबते, तेव्हा आरोग्यदायी बोन मॅरोची पुनर्स्थापना करणे आवश्यक ठरते. यासाठीच बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा वापर केला जातो. यात निरोगी स्टेम सेल्स दानशूर व्यक्तीकडून किंवा स्वतःच्या शरीरातून घेतलेल्या असतात. त्या शरीरात पुन्हा प्रत्यारोपित केले जातात; त्यामुळे बोन मॅरोचे कार्य पुन्हा पूर्ववत होते. ही प्रक्रिया नवीन नसली, तरी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ती आता अधिक सुरक्षित, परिणामकारक झाली आहे.

बोन मॅरो ट्रान्स्प्लांटमधील नवकल्पना

१) सुधारित डोनर मॅचिंग : पूर्वी संपूर्ण जुळणारा (संपूर्ण मॅच) डोनर, सामान्यतः सख्खा भाऊ किंवा बहीण असणे आवश्यक होते. आता हॅपलो-आयडेंटिकल ट्रान्स्प्लांटच्या मदतीने अर्धवट जुळणारा नातेवाइकही डोनर बनू शकतो.

२) ग्राफ्ट रिजेक्शन कमी करणे : ‘ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज’ या दुष्परिणामांना टाळण्यासाठी पूर्व-उपचार पद्धती, सुधारित इम्युनोसप्रेसिव्ह औषधे आणि ट्रान्स्प्लांटनंतरची निगा अधिक प्रभावी झाली आहे.

३) आधुनिक उपचारांची भर : संसर्ग नियंत्रण, पोषण सहाय्य, मानसिक सल्ला इत्यादी घटक उपचाराच्या यशात भर घालतात.

बोन मॅरो ट्रान्स्प्लांट केव्हा करावे?

बोन मॅरो ट्रान्स्प्लांट ही पहिली उपचार पद्धत नसते. मात्र, जेव्हा दुर्मीळ रक्तविकार औषधांना प्रतिसाद देत नाहीत किंवा अधिक गंभीर होतात, तेव्हा ट्रान्स्प्लांट एक उपाय ठरतो; केवळ लक्षणे कमी करण्याचा नव्हे, तर संपूर्ण बरे होण्याचा.

उदाहरणार्थ..थॅलेसेमिया मेजर किंवा सिकल सेल डिसीजसारख्या जन्मजात विकारांमध्ये लवकर बोन मॅरो ट्रान्स्प्लांट केल्यास आयुष्यभर रक्तस्राव टाळता येतो आणि अवयवांचे नुकसानही कमी होते. एप्लास्टिक अ‍ॅनिमियासारख्या विकारांमध्ये, जिथे बोन मॅरो पूर्णपणे कार्य करणे थांबवते, तेथे बोन मॅरो ट्रान्स्प्लांट जीवनरक्षक ठरते.महत्त्वाचे म्हणजे, उपचार लवकर सुरू करणे. अनेक कुटुंबे औषधांवरच भर देतात आणि ट्रान्स्प्लांट टाळतात. जेवढ्या लवकर ही प्रक्रिया केली जाते, तेवढे परिणाम अधिक चांगले मिळतात.

भारतातील दृष्टिकोन

भारतामध्ये बोन मॅरो ट्रान्स्प्लांटबाबतची जनजागृती आणि उपचारकेंद्रांची संख्या वाढत असली, तरी अजूनही अनेक अडचणी आहेत. भीती, खर्चाची चिंता किंवा माहितीचा अभाव यामुळे अनेक कुटुंबे हे टाळतात. सुदैवाने, आता अनेक रुग्णालये हेमॅटॉलॉजिस्ट, ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेटर, पोषणतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टीमच्या माध्यमातून सेवा देतात. जनजागृती मोहिमाही वाढल्या आहेत, त्यामुळे डोनरद्वारे ट्रान्स्प्लांटही शक्य होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे ट्रान्स्प्लांट म्हणजे जटील, धोकादायक शस्त्रक्रिया नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रामुळे जलद बरे होणे, साइड इफेक्ट्सचे उत्तम नियंत्रण आणि उपचारानंतर अधिक दर्जेदार जीवनशैली शक्य आहे.

नवजीवनाची संधी

बोन मॅरो ट्रान्स्प्लांट ही एक वैद्यकीय प्रक्रिया नसून, नवजीवनाची संधी आहे. दुर्मीळ रक्तविकारांनी त्रस्त असलेल्या अनेक बालकांसाठी आणि प्रौढांसाठीही हॉस्पिटल, बेड, इंजेक्शन्स आणि सतत थकव्याच्या त्रासातून मुक्तता आहे. तुम्ही किंवा तुमच्या प्रियजनांना असा रक्तविकार आहे व पारंपरिक उपचार निष्फळ ठरत असतील, तर थांबू नका. त्वरित हेमॅटॉलॉजिस्ट किंवा ट्रान्स्प्लांट तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेत मिळालेले मार्गदर्शन निराशा टाळू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स