लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्पर्धात्मक युग, आधुनिक जीवनशैली आणि कामाच्या ठिकाणचा तणाव, कुटुंबातील कलह आदी कारणांमुळे नैराश्य, चिंता आदी मानसिक रोगाच्या रुग्णात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे.
राज्य सरकारने पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांसह जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत मानसिक आरोग्य उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
स्मृतिभ्रंशाचेही रुग्णज्येष्ठ नागरिकांमधील स्मृतिभ्रंशाचा प्रश्नही वाढता आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या ‘मेमरी क्लिनिक’ अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे ३० हजारांनी वाढली आहे.
जगात आपल्या देशाची वाटचाल सर्वाधिक आत्महत्या करणारा देश अशी सुरू आहे. आपण सर्व पायभूत सुविधांचे जाळे निर्माण करीत आहोत. मात्र मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नाही. प्रत्येक शहरात, जिल्ह्यात मानसिक आरोग्य आयुक्तांची नेमणूक करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य आणि स्मृतिभ्रंश या दोन्ही क्षेत्रांत नागरिकांच्या आरोग्य समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, ज्याकडे प्रशासन आणि समाज दोघांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.- डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ
Web Summary : Mental health cases are rising due to modern life stresses. Increased patients seek treatment at health centers. Memory clinics also see a surge in patients. Experts stress the need for mental health focus.
Web Summary : आधुनिक जीवनशैली के तनावों के कारण मानसिक स्वास्थ्य के मामले बढ़ रहे हैं। स्वास्थ्य केंद्रों पर मरीजों की संख्या बढ़ी है। मेमोरी क्लीनिक में भी मरीजों की संख्या में वृद्धि हुई है। विशेषज्ञों ने मानसिक स्वास्थ्य पर ध्यान केंद्रित करने की आवश्यकता पर बल दिया।