शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Vitamin D Fights Corona Infection : 'Vitamin D' घेतल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:03 AM

Vitamin D Fights Corona Infection : कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी नवीन स्टडीनुसार, व्हायरसच्या गंभीर संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची महत्त्वाची भूमिका असल्याचे आढळले आहे.

Vitamin D Fights Corona Infection : कोरोनाच्या काळात शरीराला निरोगी ठेवणे ही पहिली गोष्ट आहे आणि जर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत आजारांपासून दूर राहायचे असेल तर यासाठी तुम्हाला इतर आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक तत्त्वांप्रमाणे व्हिटॅमिन डीचा (Vitamin D) आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे हाडे, स्नायू आणि दात निरोगी आणि मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. एवढेच नाही तर व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचवण्याचे काम करते. (taking vitamin d reduces the risk of serious corona infection research)

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या स्टडीनुसार, व्हिटॅमिन डी तुम्हाला कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून वाचवू शकते. कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी नवीन स्टडीनुसार, व्हायरसच्या गंभीर संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची महत्त्वाची भूमिका असल्याचे आढळले आहे. स्टडीनुसार, शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण असणे केवळ संसर्ग गंभीर होण्यापासून रोखू शकत नाही, तर मृत्यूचा धोका देखील टाळू शकते. आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

स्टडीचा निकाल...ही स्टडी आयर्लंडमधील ट्रिनिटी कॉलेज (Trinity College), स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटी (Edinburgh University) आणि चीनमधील झेजियांग युनिव्हर्सिटी (zhejiang university)यांच्या रिसर्चर्सच्या एका ग्रुपकडून करण्यात आली आहे. स्टडीचे निकाल जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाले आहेत. स्टडीमध्ये व्हिटॅमिन डीच्या अनेक स्तरांवर रिसर्च करण्यात आला. ज्याच्या आधारे रिसर्च करणाऱ्यांनी की व्हिटॅमिन डी गंभीर रोग आणि कोरोनाच्या मृत्यूपासून संरक्षण करू शकते. 

व्हिटॅमिन डी सप्लिमेंट सुरक्षितझेजियांग युनिव्हर्सिटीचे संशोधक झू ली म्हणाले, 'आमची स्टडी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट वापराच्या समर्थनासाठी आहे. त्याचा वापर केवळ हाडे आणि स्नायूंचे आरोग्य राखू शकत नाही तर कोरोनापासून संरक्षण देखील देऊ शकतो'. तर या स्टडीसंबंधित ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यापक लीना जगागा म्हणाल्या, 'कोरोना चाचणीमध्ये व्हिटॅमिन डी सप्लिमेंटला सुरक्षित असल्याचे आढळले आहे. ही प्रतिबंधाची आर्थिक पद्धत असू शकते.'  यापूर्वीच्या स्टडीमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आणि कोरोना यांच्यातील संबंधाची बाब आधीच समोर आली आहे.

व्हिटॅमिन डी कसे पुरवले जाऊ शकते?हेल्थलाईनच्या मते, जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतो, तेव्हा शरीर स्वतःच व्हिटॅमिन डी तयार करते. हेच कारण आहे की या व्हिटॅमिनला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हणतात. मात्र, असे काही पदार्थ आहेत ज्यात व्हिटॅमिन डी असते. उदाहरणार्थ, सॅल्मन, लिव्हर ऑइल, ट्यूना, अंड्यातील पिवळ बलक, मशरूम, गाईचे दूध, सोयाबीनचे दूध, संत्र्याचा रस, ओटमील इत्यादींचे सेवन करून शरीरात व्हिटॅमिन डी पुरवले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, तुम्ही व्हिटॅमिन डी असलेले सप्लिमेंट इत्यादी देखील घेऊ शकता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या