मुलांची विशेष काळजी घ्या
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:04+5:302015-02-21T00:50:04+5:30
मुलांची विशेष काळजी घ्या

मुलांची विशेष काळजी घ्या
म लांची विशेष काळजी घ्या-इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स :स्वाईन फ्लूची भीती नको खबरदारी घ्या : (फोटो आहे)नागपूर : गेल्या काही दिवसांत चिमुरड्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. राज्यासह नागपुरात स्वाईन फ्लू वाढत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आणि लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूरच्यावतीने शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आले. यावेळी इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूरचे अध्यक्ष डॉ. आर.जी. पाटील, सचिव डॉ. गिरीश चरडे, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. संजय मराठे आदी उपस्थित होते. डॉ. मराठे म्हणाले, स्वाईन फ्लूचा खोकल्यातून, शिंकण्यातून जास्त प्रमाणात संसर्ग होतो. यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लहान मुले एकत्र खेळतात, वर्गात बाजूबाजूला बसतात, एकमेकांच्या वह्या, पुस्तके हाताळतात, खेळणी हाताळतात यामुळे एका मुलाला स्वाईन फ्लूची लागण झाली असल्यास दुसऱ्या मुलांना त्याची लागण पटकन होऊ शकते. लहान मुलांना हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, ताप असे आजार उद्भवतात. पण साधा फ्लू असल्यास दोन दिवसांत बरा होता. सर्दी, खोकलाही तीन ते चार दिवसांत बरा होतो. पण, मुलांमध्ये ही लक्षणे अधिक काळ आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, असेही ते म्हणाले. - स्वाईन फ्लूची लस देता येईलडॉ. देवपुजारी म्हणाले, कोणती साथ आल्यावर त्याची लस देणे अत्यंत गरजेचे असते. सध्या स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस देणे गरजेचे वाटत असल्यास ती नक्की देण्यात यावी. स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यताप्राप्त आहे. सहा महिन्यावरील मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ही लस घेता येते. परंतु लस दिल्यानंतर हा आजार होणारच नाही, असे नाही. आवश्यक ती खबरदारी घ्यायलाच हवी. या लसीचा प्रभाव साधारण सहा ते आठ महिन्यांचा असतो.