शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

दिवस उकाड्याचे, आराेग्याची काळजी घेण्याचे; दररोज प्या ८ ते १० ग्लास पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 05:22 IST

आराेग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत; उन्हाळ्यात वातावरणातील तापमानात वाढ होत असल्याने कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात.

मुंबई : मार्च महिना सरत असतानाच कमाल तापमानात वाढ होते आहे. तापमानाचा पारा ३८ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. कोकणला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने उन्हाच्या आणखी झळा बसणार आहेत. उन्हाळ्यात शरीराच्या तापमानात अचानक वाढ होत असल्याने आजार होऊ शकतात. उन्हामुळे स्ट्रोकचा धोका सर्वांधिक असतो. परिणामी अशा वेळी आरोग्याची अधिकाधिक काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले.

डॉ. मनीषा भट्ट यांनी सांगितले की, उन्हाळ्यात वातावरणातील तापमानात वाढ होत असल्याने कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. यामुळे अनेक उन्हाळी आजारांचाही सामना करावा लागतो. उष्णतेमुळे शरीरातून घाम निघत असल्याने बऱ्याचदा अनेकांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. यासाठी उष्माघात, ताप, कांजण्या, कावीळ, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, यांसारखे त्रासही होतात. याशिवाय उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जसे की, त्वचा लाल पडणे, जळजळ होणे आणि त्वचा कोरडी पडणे अशी समस्या उद्भवू शकते. पायात अधिक तास शूज घालून राहिल्याने पायाला संसर्ग होण्याचा धोका असतो.

डॉ. छाया वाजा म्हणाल्या की, उन्हाळ्यात शरीराच्या तापमानात अचानक वाढ होत असल्याने विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. कडक उन्हामुळे स्ट्रोकचा धोका सर्वांधिक असतो. अशा वेळी रुग्णाला दाखल करून उपचार करावे लागतात. काहींना चक्कर येणे किंवा वारंवार उलट्या होणे असा त्रासही होऊ शकतो. लहान मुलांना आणि पन्नाशीच्या पुढील व्यक्तींना उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. नारळाचे पाणी, केळी, फळांचा रस, इलेक्ट्राॅल पावडर आणि पौष्टिक आहार घ्यावा. जंकफूड, दारू, मसालेदार खाद्यपदार्थ खाणे टाळावे. त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शरीराला थंडावा मिळेल, असेच पदार्थ खा...दररोज दोनदा आंघोळ करा. हलका आहार घ्या. थंडपेय प्या. फळभाज्यांचा आहारात समावेश करा. शरीराला थंडावा मिळेल, असे पदार्थ खा. तेलकट, मसालेदार आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा. उन्हात डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी घराबाहेर पडताना सनग्लासेस वापरा. घामोळे हाेऊ नये, यासाठी टाल्कम पावडर वापरा.

टॅग्स :weatherहवामान