शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

फुप्फुसं कमजोर होत असल्याचे काही संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:49 IST

Lungs Problem Symptoms : फुप्फुसांमध्ये काही समस्या असेल तर शरीर काही संकेत देतं. हे संकेत वेळीच ओळखणं गरजेचं असतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Lungs Problem Symptoms : जसजसं वय वाढतं तसतसे आपल्या शरीरातील वेगवेगळे अवयव कमजोर होऊ लागतात. आरोग्याची योग्य ती काळजी घेतली नाही तरी वेगवेगळ्या अवयवांच्या क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो. याच कारणाने आपली फुप्फुसे कमजोर होऊ लागतात. त्यात प्रदूषणामुळे त्यांचं अधिक नुकसान होतं.वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2022 नुसार, भारतात वायु प्रदूषण फार जास्त आहे. त्यामुळे दुषित हवेत श्वास घेतल्याने फुप्फुसांचं नुकसान होतं. अशात शरीर काही संकेत देतं. हे संकेत वेळीच ओळखणं गरजेचं असतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कमजोर फुप्फुसांचे संकेत

श्वास घेण्यास अडचण

जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हा संकेत फुप्फुसाची क्षमता कमी झाल्याचा आहे. ही समस्या सामान्यपणे पायऱ्या चढताना किंवा एक्सरसाईज करताना होते. तसेच ही समस्या वयासोबतच फुप्फुसांची इलास्टिसीटी कमी झाल्यामुळे किंवा फुप्फुसांना प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानांमुळेही होतं.

सतत खोकला

कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला सतत खोकला येत असेल तर हा फुप्फुसाच्या समस्येचा संकेत असू शकतो. हा फुप्फुसामध्ये जळजळ किंवा सूज असण्याचा संकेत असू शकतो. सोबतच कफ येणंही फुप्फुसाची समस्या असण्याचं संकेत असू शकतो. जर ही समस्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त राहत असेल तर वेळीच सावध व्हा.

अस्वस्थता

जर तुम्हाला श्वास घेतेवेळी घाबरल्यासारखं वाटत असेल तर फुप्फुसामध्ये सूज किंवा कॉन्स्ट्रिक्शनचा संकेत असू शकतो. त्यामुळे अशी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

छातीमध्ये वेदना

खोकताना छातीत सतत वेदना होत असेल तर हा फुप्फुसाची समस्या असण्याचं संकेत असू शकतो. हा फुप्फुसामध्ये सूज किंवा इन्फेक्शनचा संकेत असू शकतो.

सतत थकवा

जर तुम्हाला फार काही जास्त मेहनत न करता थकवा जाणवत असेल तर हा फुप्फुसाची समस्या असण्याचा संकेत असू शकतो. फुप्फुसं जेव्हा योग्यपणे काम करत नाहीत, तेव्हा शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही. ज्यामुळे थकवा जाणवतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य