शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांची चिंता वाढली, प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे, दुर्लक्ष न करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:11 IST

मुंबईत गोवरचा उद्रेक झाला आहे. अनेक बालके उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता मुंबईकरांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे दिसून येत आहेत.

मुंबईत गोवरचा उद्रेक झाला आहे. अनेक बालके उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. आत्तापर्यंत काही बालकांचा जीवही गेला आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मात्र आता मुंबईकरांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे दिसून येत आहेत. १८ ते २२ वर्षे वयोगटातील दोन जणांना गोवरची लक्षणे दिसून येत आहेत. 

मुंबईतील काही भागात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. एम पूर्व भागात १८ ते २२ मधील दोन संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या गोवंडी परिसरात गोवरचे अनेक रुग्ण असल्याचा संशय आहे. त्यांच्या शरीरावर पुरळ आहेत. यावरुन केवळ नवजात बालके नाही तर मोठ्यांना सुद्धा गोवरची लागण होत आहे.सध्या या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

मोठ्यांना गोवर होण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अनोकांना आपण लहानपणी लस घेतली की नाही हे आठवतही नसेल. मात्र सध्या गोवरचा विळखा बघता मोठ्यांनाही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे गोवर रुग्णांच्या संपर्कात येऊ नका असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.

महापालिका सज्ज 

गोवरचा वाढता उद्रेक बघता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. गोवरविषयी जनजागृती केली जात आहे. ताप, अंगावर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात जाण्याचे आवाहन केले जात आहे. तर धारावीत प्रत्येक घरात जाऊन लसीकरण, विचारपुस केली जात आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक प्रबोधनासाठी धर्मगुरुंची मदत घ्या असे आवाहवन केले आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सInfectious Diseaseसंसर्गजन्य रोगhospitalहॉस्पिटलkidsलहान मुलं