शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
2
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
3
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
5
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
6
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
7
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
8
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
9
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
11
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
12
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
13
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
14
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
15
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
16
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
17
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
18
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
19
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक

Symptoms of Diabetes: 'ही' समस्या आहे डायबिटीसचं गंभीर लक्षण, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:36 IST

Symptoms of Diabetes: डायबिटीस तेव्हा होतो जेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) प्रमाणापेक्षा जास्त होते. ही स्थिती तेव्हा येते जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता होते किंवा शरीराच्या कोशिका हार्मोन्सप्रति प्रतिक्रिया देणं बंद करतात.

Symptoms of Diabetes: डायबिटीस (Diabetes) एक फारच कॉमन आजार होत चालला आहे. जर हा आजार एकदा कुणाला झाला तर आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. डायबिटीस तेव्हा होतो जेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) प्रमाणापेक्षा जास्त होते. ही स्थिती तेव्हा येते जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता होते किंवा शरीराच्या कोशिका हार्मोन्सप्रति प्रतिक्रिया देणं बंद करतात.

डायबिटीस कंट्रोल झाला नाही तर अनेक शारीरिक समस्या जसे की, हार्ट अटॅक, किडनी डिजीज, डोळ्यांची समस्या, एम्प्यूटेशन इत्यादीची शक्यता वाढते. अशात डायबिटीसला कंट्रोल करण्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही तुमची ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवा.

हाय ब्लड शुगर लेव्हलचे अनेक संकेत आणि लक्षणं दिसतात. जसे की, जास्त तहान लागणे, धुसर दिसणे, अधिक लघवी लागणे, थकवा आणि अचानक वजन कमी होणे. शुगर लेव्हल अधिक झाल्याचा आणखी एक गंभीर संकेत आहे सतत कफ असलेला खोकला येणे. जर तुम्हालाही अनेक दिवसांपासून क्रोनिक कफची समस्या असेल, याकडे दुर्लक्ष करू नका.

बीएमसी पल्मोनरी मेडिसीन जर्नलमध्ये २०१७ मध्ये प्रकाशित एका तुलनात्मक रिसर्चनुसार, कफसोबत येणारा क्रोनिक खोकला हा हाय ब्लड शुगर लेव्हलचा गंभीर संकेत असू शकतो. या रिसर्चमध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन मॉडलच्या माध्यमातून रेस्पिरेटरी लक्षणांवर टाइप २ डायबिटीसच्या प्रभावाची टेस्ट केली. रिसर्चमध्ये परिणामांनुसार, टाइप २ डायबिटीस आणि खोकला यात संबंध आढळून आला.

यानुसार, टाइप २ डायबिटीस असलेल्या व्यक्तींमध्ये  सेल्फ रिपोर्टेड डिस्पेनिया आढळून आला. डिस्पेनिया एक खोकल्यासंबंधी समस्या आहे. ज्यात दम लागणे, मोठा श्वास घेण्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. यामुळे छातीत दाटल्यासारखं वाटतं. रिसर्चचे तज्ज्ञ या निष्कर्षावर पोहोचले की, टाइप २ डायबिटीसने ग्रस्त लोक समान वयाच्या लोकांच्या तुलनेत ग्रेड २ डिस्पेनिया आणि क्रोनिक कफने अधिक प्रभावित होतात. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका