शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चक्कर येणे नाही सामान्य, असु शकतो गंभीर आजारांचा धोका; वेळीच करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 17:42 IST

आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

बहुतेक लोकांना चक्कर येण्याची समस्या असते. कधी-कधी बराच वेळ बसून राहिल्यानंतर अचानक उठल्यानंतरही चक्कर येते. सतत चक्कर येणं ही चांगली गोष्ट नाही. शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा किंवा इतर कोणत्याही शारीरिक समस्यांमुळे तीव्र चक्कर येऊ शकते. यामुळे एखादी व्यक्ती उठल्याबरोबर अचानक कुठेही पडून दुखापत होऊ शकते. उन्हाळ्यात उन्हात जास्त वेळ चालल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊनही चक्कर आल्यासारखे होते. ज्या लोकांना खूप कमी किंवा उच्च रक्तदाब, मॉर्निंग सिकनेस, मधुमेह आहे, त्यांनाही चक्कर येणे किंवा वर्टिगो (Vertigo) ची समस्या असू शकते. आपल्याला वारंवार खूप चक्कर येत असेल आणि उलट्या होत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण (Remedies for Dizziness) कोणते उपाय करू शकतो, ते जाणून घेऊया.

पेपरमिंट तेल -काही तेलांच्या वापराने चक्कर येण्याच्या समस्येवर मात करता येते. यासाठी तुम्ही पुदिना तेलाचे दोन ते तीन थेंब आणि एक छोटा चमचा बदाम तेल घ्या. ते मिसळा आणि कपाळावर आणि मानेच्या मागील बाजूस चांगले लावा. उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्यांवर पेपरमिंट तेलाने मात करता येते.

तळव्यांना आल्याचे तेल लावा -आल्याच्या तेलाने चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. या तेलाचे दोन ते तीन थेंब घेऊन ते मानेच्या मागील बाजूस, कानांच्या मागे आणि पायाच्या तळव्याखाली लावावे. जेव्हा तुम्हाला चक्कर येते तेव्हा या ठिकाणी हे तेल नक्कीच लावा. आल्यामध्ये मळमळ विरोधी घटक असतात. याच्या मदतीने उलटी, चक्कर येण्याचा त्रास कमी होतो. आल्याचा छोटा तुकडा चघळूनही खाऊ शकता. चक्कर येताच आल्याचा चहा प्या.

फळांचा रस (ज्युस) प्या -काही फळांचा रस प्यायल्यानेही चक्कर येण्याची समस्याही कमी होऊ शकते. तुम्ही लिंबू, अननस, गाजर, संत्री, आले इत्यादींचा रस प्या. हे सर्व रस दिवसातून एकदा प्या. लिंबाचा रस बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. थोडे काळे मीठ, काळी मिरी पावडर टाकून प्या. दोन चमचे आल्याचा रस काढा. तो एक कप पाण्यात मिसळा. इच्छित असल्यास, चवीनुसार मध देखील थोडे घातले जाऊ शकते. हे सर्व रस काही दिवस प्यायल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होईल. गाजर, अननस, संत्री शरीराला ऊर्जा देतात. चक्कर येण्याची लक्षणे कमी होतात. लिंबामध्ये असे घटक असतात जे मळमळण्याची समस्या कमी करतात, ज्यामुळे उलट्या होत नाहीत.

निरोगी आहार घ्या -सकस आहार घ्या. तुम्ही जे काही खात आहात, त्यात पोषक तत्वे भरपूर असली पाहिजेत, ज्यामुळे शरीरात लोह, रक्त, हिमोग्लोबिन इत्यादींची कमतरता भासू नये. सकस आहाराने शरीर आणि मन व्यवस्थित कार्य करते. शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरेसे ठेवा. यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व द्रवपदार्थांचा प्रवाह सुरळीतपणे चालू राहील, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. ब्लॉकेजमुळेही चक्कर येते. हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन बी 3, नियासिन, पोटॅशियम, संपूर्ण धान्यापासून बनवलेले पदार्थ, भाज्यांचे रस इत्यादी खा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स