शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पायाला सुज येणं नाही सामान्य, दुर्लक्ष कराल तर 'या' गंभीर आजारांचा त्रास कायमचा सहन करावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 17:39 IST

कारणे नसताना देखील पाय सुजणे गंभीर समस्या आहे. जर श्वासोच्छवासासह किंवा छातीत दुखत असल्यास पायात सूज येत असेल तर तज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा. 

सुजण्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी पायात दुखापत, मुरगळणे इत्यादीमुळे सूज येते. जे लोक दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. त्यांचे पाय सतत लटकल्यामुळे सुजण्याची समस्या असते. परंतू ही कारणे नसताना देखील पाय सुजणे गंभीर समस्या आहे. जर श्वासोच्छवासासह किंवा छातीत दुखत असल्यास पायात सूज येत असेल तर तज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा. 

मूत्रपिंड समस्यासहसा तज्ञ पायात सूज पाहूनच मूत्रपिंड चाचणी करण्याची सल्ला देतात. ज्यांची किडनी नीट काम करत नाही, त्यांच्या शरीरातील द्रव गोळा होते. अशा स्थितीत दम लागणे, पायात सूज येणे, लघवी कमी होणे, थकवा येणे इत्यादी समस्या समोर येतात. म्हणूनच, जर पायावर सूज येत असेल तर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हृदयरोगाचा धोकाकधीकधी हृदय योग्यरित्या कार्य करत नसल्यास हृदय रक्त व्यवस्थित पंप करू शकत नाही. अशा परिस्थितीत ते पाणी आणि मीठ टिकवून ठेवू लागते. या स्थितीत पायात सूज येऊ शकते. या व्यतिरिक्त, हृदयाचा वेग वाढणे, दम लागणे, अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे इत्यादी लक्षणे देखील दिसू शकतात.

यकृताची समस्याअल्ब्युमिन नावाचे प्रथिने तुमच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर पडण्यास प्रतिबंध करते. कधीकधी यकृत अल्ब्युमिन बनवणे थांबवते. अशा स्थितीत शरीरात या प्रथिनाची कमतरता होते. यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त देखील बाहेर पडू शकते. अशा स्थितीत तुमच्या पायामध्ये सूज येते. या स्थितीत, तुम्हाला कावीळ, लघवीचा रंग बदलणे, शारीरिक थकवा इत्यादी लक्षणे देखील येऊ शकतात.

लिम्फॅटिक कारणीभूतआपल्या शरीराची लिम्फॅटिक प्रणाली शरीरातील विष आणि बॅक्टेरिया काढून टाकते. जेव्हा ही प्रणाली योग्यरित्या आपले काम करत नाही, तेव्हा शरीरात विष जमा होऊ लागते. अशा स्थितीत संसर्ग होतो आणि हात किंवा पायात सूज येऊ लागते. कधीकधी दोन्ही हात किंवा दोन्ही पायांवर सूज येते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स