स्वाइन फ्लूने घेतला दोघांचा बळी
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:10+5:302015-02-13T23:11:10+5:30
पुणे : शहराला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला असून या आजाराने आणखी दोघांचा बळी घेतला. दोघेही पुण्यातील रहाणारे होते. यामुळे यावर्षातील बळींची संख्यया १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूची लागण नागरिकांना झपाटयाने होऊ लागली असून गेल्या ४ दिवसात तब्बल ३८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली.

स्वाइन फ्लूने घेतला दोघांचा बळी
प णे : शहराला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला असून या आजाराने आणखी दोघांचा बळी घेतला. दोघेही पुण्यातील रहाणारे होते. यामुळे यावर्षातील बळींची संख्यया १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूची लागण नागरिकांना झपाटयाने होऊ लागली असून गेल्या ४ दिवसात तब्बल ३८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली.धायरी येथे राहणार्या ३८ वर्षीय महिलेचा आणि शुक्रवार पेठेत राहणार्या ५५ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहेत. दि. १० ते १३ फेब्रुवारी या ४ दिवसांमध्ये शहरात तब्बल स्वाइन फ्लूचे नवे ३८ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून तपासणीसाठी येणार्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ लागली आहे. आज दिवसभरात १ हजार २७२ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली.