स्वाइन फ्लूने तरुणीचा मृत्यू
By Admin | Updated: March 13, 2015 06:27 IST2015-03-13T06:27:44+5:302015-03-13T06:27:44+5:30
शहरातील स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी पिंपरीतील एका तरुणीचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २० वर जाऊन पोहचली आहे.

स्वाइन फ्लूने तरुणीचा मृत्यू
पिंपरी : शहरातील स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी पिंपरीतील एका तरुणीचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २० वर जाऊन पोहचली आहे.
वर्षा अनिल कुरेजा (वय २०, रा. पिंपरी) यांचा मृत्यू सकाळी १० ला पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला. त्यांना २६ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यामध्ये स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
५ हजार ७३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक हजार २१५ रुग्णांना सर्दी, खोकला, हे आजार दिसून आले. त्यातील स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आलेल्या २६० रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या दिलेल्या आहेत. ७ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ५ रुग्ण स्वाइन फ्लू झालेले आढळून आले आहेत. २० रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर स्वाइन फ्लूबाबत महापालिकेने प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)